तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तिघांचा मृत्यू
बार्शीत शोभेच्या दारुच्या कारखान्यात स्फोट झाला असून, या स्फोटामुळे किमान 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर हा शोभेच्या दारुचा कारखाना आहे. आज (1 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास या कारखान्यात स्फोट झाला आणि स्फोटाचं आगीत रुपांतर झालं.
ही आग विझविण्यासाठी सोलापूर शहर, उस्मानाबाद, लातूर, कुर्डूवाडी, बार्शी नगरपालिकासह अन्य जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे वाहने घटनास्थळावर दाखल झाली असून आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "स्फोट झालेल्या कारखान्यात 12 जणं होती, असं मला इथं आल्यानंतर माहिती मिळाली. यातील 6 जणांना सुखरूप बाहेर काढलं, तर उर्वरीत 6 पैकी 3 जणाचा आगीत मृत्यू झाला. जखमी असलेल्या तिघांना सोलापूर शहरात रुग्णालयात हलवण्यात आलंय."
आगीचे लोट परिसरातील 10 किलोमीटर परिसरापर्यंत दिसून येत आहेत.
मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलिस प्रयत्न करीत आहेत.
कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत.
दरम्यान, या स्फोट आणि आगीमुळे कारखान्याची राखरांगोळी झाली आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)