तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
इस्लामिक स्टेटच्या पाडावानंतर ताब्यात घेतलेले लोक सध्या काय करत आहेत?
सीरियामध्ये 2019 साली इस्लामिक स्टेट अर्थात IS (आधी ISIS) या गटाचा पाडाव झाला. त्यावेळी या संघटनेच्या ताब्यातील भागातून हजारो मुलं आणि महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
त्यातले अनेकजण परदेशी नागरीक आहेत. मूळचा ट्यूनिशियाचा असलेला असीम त्यापैकीच एक आहे. त्याच्या भावानं IS मध्ये प्रवेश केला, तेव्हा तो असीमला सोबत घेऊन आला होता.
असीमसारखे अनेकजण इथून बाहेर पडण्याची वाट पाहात आहेत. बीबीसी पर्शियन सर्व्हिसच्या प्रतिनिधी नफिसेह कोहनावार्द यांना त्या शिबिरात जाण्याची परवानगी मिळाली, जिथे असीमसारख्या अन्य हजारोंना ठेवण्यात आलं आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)