रशियाचा दावा – ‘पुतिन यांची हत्या करण्यासाठी युक्रेनचा क्रेमलिनवर ड्रोन हल्ला’

Published

युक्रेनने अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. मंगळवारी (2 मे) रात्री दोन ड्रोनने क्रेमलिनवर हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे.

या कथित हल्ल्यासाठी दोन ड्रोन वापरले गेले होते, मात्र रशियाच्या बचाव यंत्रणेकडून ते निकामी करण्यात आल्याचं क्रेमलिनने म्हटलं आहे.

हल्ला झाला तेव्हा पुतिन क्रेमलिनमध्ये नव्हते आणि या हल्ल्यात इमारतीचंदेखील कोणतंही नुकसान झालं नाही, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थांनी दिली आहे.

मॉस्कोमधील क्रेमलिनच्या इमारतीच्या परिसरातून धूर येत असल्याची दृश्यं सोशल मीडियावरून शेअर केली जात आहेत. मात्र, या दृश्यांच्या सत्यतेबद्दल कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाहीये.

युक्रेनने या हल्ल्यावर कोणतेही प्रतिक्रिया व्यक्त केली नाहीये.

क्रेमलिनने या हल्ल्याची संभावना ‘नियोजित दहशतवादी हल्ला’ या शब्दांत केली आहे. या हल्ल्याला केव्हा आणि कसं प्रत्युत्तर द्यायचं हे ठरवलं जाईल, असं रशियाने म्हटल्याच, RIA या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)