फिफा महिला विश्वचषकात स्पेनची बाजी, अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव

    • Author, नील जॉनस्टन
    • Role, बीबीसी स्पोर्ट्स
    • Reporting from, सिडनी (ऑस्ट्रेलिया)
  • Published

स्पेनच्या संघानं यंदाच्या महिला फुटबॉल विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात स्पेननं इंग्लंडला 1-0 असं पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये आज (20 ऑगस्ट) पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या संघातील ओल्गा कारमोना हिने विजयी गोल केला.

स्पेनच्या संघानं पहिल्यांदाच महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे.

फुटबॉल विश्वचषक जिंकणारा स्पेन पाचवी टीम ठरलीय.

स्पेनने जपानला ग्रुप स्टेजमध्ये 4-0 ने पराभव केला होता. त्यानंतर टीमचा प्रवास एकदम जोमाचा झाला.

सिडनीतल्या ज्या मैदानात अंतिम सामना खेळवला गेला, तिथं सामना पाहण्यासाठी सुमारे 75 हजार फुटबॉलप्रेमी प्रेक्षक उपस्थित होते.

हा सामना बीबीसी वन टीव्ही चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला गेला. कोट्यवधी लोकांनी हा सामना पाहिला.

महिला विश्वकपचं हे नववं पर्व होतं. आतापर्यंत चार वेगवेगळ्या टीम वर्ल्ड कप जिंकली होती.

आतापर्यंत अमेरिकेने चार वेळा, जर्मनीने दोन वेळा, नॉर्वे आणि जपानने एक एकदा महिला वर्ल्ड कप जिंकला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,  आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)