तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
खासगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी - सुप्रीम कोर्ट
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
कोरोना लस कधी येणार?
नवीन पेजवर पुढचे अपडेट्स
हे लाईव्ह पेज आता बंद करण्यात आलं आहे. इथून पुढचे सर्व ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी इथं क्लि करा
बर्नी सँडर्स राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर
अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या बर्नी सँडर्स यांनी आपली प्रचारमोहीम स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.
या घोषणेमुळे माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सँडर्स यांनी आपल्या प्रचारमोहिमेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना एका कॉन्फरन्स कॉलद्वारे ही माहिती दिली.
महाराष्ट्रात मृतांचं प्रमाण कमी आहे की जास्त? - सोपी गोष्ट
दिल्लीमधले 20 हॉटस्पॉट सील होणार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनं ‘हॉटस्पॉट’ ठरू शकणाऱ्या भागांना सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं, की दिल्लीतील वीस भाग सील केले जातील. या ठिकाणी गरजेचं सामान पोहोचेल याची काळजी सरकारकडून घेण्यात येईल.
उत्तर प्रदेश सरकारनं 15 जिल्ह्यातील हॉटस्पॉट निश्चित केले असून या भागांना सील करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गाझियाबादमधले 13, नॉयडामधले 12, कानपूरमधले 12 आणि वाराणसीतले 4 हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
आग्र्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 22 हॉटस्पॉट आहेत.
आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखांना आत्मसमर्पणासाठी एक आठवड्याची मुदत
तबलीगी जमातच्या मुद्द्यावर WHOने काय भूमिका घेतलीय?
राज्यात कोरोनाचे 117 नवीन रुग्ण, रुग्णांची एकूण संख्या 1135
राज्यात आज कोरोनाचे 117 नवीन रुग्ण आढळून आले. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1135 झाली आहे. आज राज्यात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
या 8 पैकी 5 रुग्ण हे मुंबईतील आहेत, तर दोन रुग्ण पुण्यातील आहेत. एक रुग्ण कल्याण-डोंबिवलीतील आहे.
कोव्हिड-19 मुळे राज्यातील मृतांचा एकूण आकडा 72 झाला आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी-
मुंबई- 714
पुणे- 172
पिंपरी-चिंचवड- 17
ठाणे मनपा- 24
कल्याण-डोंबिवली मनपा- 26
नवी मुंबई - 29
सांगली- 26
नागपूर- 19
अहमदनगर- 16
औरंगाबाद- 12
लॉकडाऊनचा नियम तोडल्यामुळे मंत्री निलंबित
लॉकडाऊन असतानाही आपल्या सहकारी खासदारासोबत जेवण घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दूरसंचार मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्टेला एन्दाबेन अब्राहम्स यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यावर देशभर चर्चा सुरू झाली.
या फोटोत त्या खासदार एम्दुदुजी मनाना यांच्या घरी त्यांच्या कुटुंबासोबत जेवण घेताना दिसत होत्या. हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आणि त्यानंतर संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्यात आली.
आजचा #CoronaPodcast
खाजगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी होणार - सुप्रीम कोर्टाचा आदेश
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यासंबंधीच्या आवश्यक चाचण्या करण्याची परवानगी काही खाजगी लॅबनाही देण्यात आली आहे.
मात्र चाचणी खासगी रुग्णालयात झाली काय किंवा सरकारी रुग्णालयात झाली काय, ती विनामूल्यच व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
या चाचण्या NABLच्या निकषांवर काम करणाऱ्या किंवा WHO/ ICMR ने परवानगी दिलेल्या प्रयोगशाळांमध्येच व्हाव्यात. असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
हा निर्णय तात्काळ लागू करण्यात यावा, असाही आदेश न्यायालयानं दिला आहे.
माझ्या सन्मानासाठी उभं राहण्यापेक्षा गरीब कुटुंबाची जबाबदारी घ्या - मोदी
'मोदींचा सन्मान करण्यासाठी 5 मिनिटं उभं राहा, असं अभियान काही लोकांनी सोशल मीडियावर सुरू केलं असून हा म्हणजे मला एखाद्या वादात ओढण्याचा प्रकार असल्याचं वाटत आहे,' अशा आशयांचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
'जर हे खरंच माझ्या सन्मानासाठी असेल आणि तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल तर याऐवजी एखाद्या गरीब कुटुंबाची जबाबदारी घ्या, असंही मोदींनी सांगितलं. जोपर्यंत कोरोनाचं संकट दूर होत नाही, तोपर्यंत एका गरीब कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेतली, तर तोच माझ्यासाठी मोठा सन्मान असेल,' असं म्हणत मोदींनी कोरोनाच्या संकटाचा विसर पडू देऊ नका, असंच अप्रत्यक्षपणे सुनावलं.
बोरिस जॉन्सन यांची प्रकृती स्थिर
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे गेले दोन दिवस अतिदक्षता विभागात आहेत.
मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून उपचाराचे परिणाम दिसून येत असल्याची माहिती 10 डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
बोरिस जॉन्सन यांना लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
जॉन्सन सर्व उपचारादरम्यान अतिशय सकारात्मक असल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं.
मुंबईत बाहेर पडताना मास्क न घातल्यास दंड
धारावीमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन धारावीमध्ये सोशल डिस्टन्सिंग प्रभावीपणे पाळलं जावं यासाठी उपाययोजना सुरू आहेत. मी त्यासंबंधी मंगळवारी (7एप्रिल) धारावी पोलिस स्टेशनला भेट दिली. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याशीही चर्चा केली असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.
धारावीमध्ये संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेसंबंधी विशेष काळजी घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आता बाहेर जाताना मास्क घालणं बंधनकारक असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे, अशा पुणे, सांगली, नागपूरसारख्या ठिकाणीही नागरिकांना मास्क बंधनकारक करण्याचा विचार करत असल्याचं टोपेंनी सांगितलं.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर हा 6 टक्क्यांवर गेला असून तो सरासरी मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. यामध्ये को-मॉर्बिडिटी म्हणजे मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार अशा आजारानं ग्रासलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे, अशी माहिती टोपेंनी दिली.
आज इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक झाल्याचं सांगून या बैठकीत प्रत्येक तालुक्यात एक रक्षक हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
स्पेनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 15 हजार जण मृत्युमुखी
स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी वाढ पहायला मिळाली आहे. आज स्पेमध्ये कोरोनामुळे 757 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (7 एप्रिल) कोरोनामुळे 743 जण मृत्यूमुखी पडले.
स्पेनमध्ये आतापर्यंत 15 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
2 एप्रिलला स्पेनमध्ये 950 जणांचा मृत्यू झाला होता. हा आकडा सर्वाधिक होता.स्पेनमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 6,180 नवीन लोकांना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली होती. स्पेनमध्ये आतापर्यंत 1 लाख 47 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
नरेंद्र मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
देशात लागू केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलला संपणार आहे. लॉकडाऊन वाढविण्याच्या दृष्टिने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
'चक दे!' 81 वर्षांच्या आजीने अशी केली कोरोनावर मात
मुख्यमंत्र्यांचं सैन्यातील निवृत्त डॉक्टरांना आवाहन – 11 महत्त्वाचे मुद्दे