तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
मुंबईत आता मृतांचा आकडा 101, एकूण रुग्णांची संख्या 1,703
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
आता पुढील पानावर नवे अपडेट्स
या पानावरील LIVE कव्हरेज इथंच बंद करण्यात आलं आहे. पुढील सर्व LIVE अपडेट्स पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
आज दिवसभरात काय काय घडलं?
एकदा जाता जाता पाहू या, कोरोना व्हायरससंदर्भात आज दिवसभरात काय काय घडलं -
- महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 352 ने वाढून 2334 वर पोहोचलीय
- 15 एप्रिलपासून नवी मुंबईतील APMC मधील कांदा, बटाटा मार्केट उघडणार
- भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 9325 वर पोहोचली, तर मृतांची संख्या 324 झालीय
- जगभरातील रुग्णांची संख्या आज 19 लाखांवर पोहोचली आहे, अमेरिकेत सर्वांत जास्त बळी
- ICUमधून घरी परतलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
- ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 11 हजारच्याही पुढे
काळजी घ्या. शुभरात्री.
‘लॉकडाऊनमध्ये मिळे ना दारू, सांगा आता मी काय करू!’
हजारो मृत्यू पाहिलेले डॉक्टर्स ICUमधून काय सांगतायत...
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्स
कोरोना व्हायरसबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं टास्क फोर्सची स्थापना केलीय. डॉ. संजय ओक हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील.
लॉकडाऊन आणि पॅकअप: बॉलिवुड सध्या काय करतंय
जगभरात रुग्णांचा आकडा 19 लाखांपेक्षाही जास्त
जगभरात आजपर्यंत 19 लाख पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 लाख 34 हजार रुग्ण बरे झाले आहेत तर मृतांचा आकडा सुमारे 1 लाख 14 हजारच्याही पुढे गेला आहे.
ब्रिटनमध्ये मृतांची संख्या 11,329 वर पोहोचली
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. गेल्या 24 तासात 717 लोकांचा मृत्यू झाला.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळं आतापर्यंत 11,329 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2334 वर पोहोचली
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 352 ने वाढून 2334 वर पोहोचलीय.
जिल्हा आणि महापालिकानिहाय आकडेवारी :
'मुख्यमंत्री सहाय्यता निधीला CSR अंतर्गत मान्यता द्या'
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला CSR अंतर्गत मान्यता द्या, असा आग्रह महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांकडे करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
त्या आशयाचं त्यांचं पत्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठवली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे आंबेडकर जयंती कशी साजरी करायची?
मुंबईतील मृतांची संख्या 100 वर पोहोचली
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1449 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 100 जण मृत्युमुखी पडलेत. तर 141 जण बरे होऊन घरी परतलेत.
तसंच, 4733 संशयित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. मुंबई महापालिकेनं यासंदर्भात माहिती दिली.
दिल्लीत कंटेनमेंट झोनची संख्या 47 वर पोहोचलीय
दिल्लीत कंटेनमेंट झोनची संख्या 47 वर पोहोचली आहे.
आजचा #CoronaPodcast
कोरोनासंदर्भात दिवसभरात नेमकं काय घडलं याबद्दल सांगतायत आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड
आजचं कार्टून
बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तिश यांनी पाहा आज काय रेखाटलंय...
उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबात उद्योगमंत्र्यांच्या सूचना
मुंबई, पुण्यासारख्या रेड झोनना वगळून इतर जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना उद्योगमंत्री अनिल देसाई यांनी दिल्या आहेत.
पुणे: मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्याला कोर्टानं दंड ठोठावला
मास्क न घालताच घराबाहेर फिरणाऱ्या 31 वर्षीय व्यक्तीला पुणे कोर्टानं दोषी ठरवलं. एक हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. लॉकडाऊन असतानाही मास्क न घालता ही व्यक्ती गाडीवरून बाहेर फिरत होती.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह