तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

मुंबईत एकाच दिवसात 184 नवे रुग्ण, राज्यातल्या रुग्णांची संख्या 3648 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत एकही मृत्यू नाही, 59 जणांना डिस्चार्ज

    मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झालेले आतापर्यंत 1402 रुग्ण आढळून आले. पण दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात आतापर्यंत एकूण 69 मृत्यू झाले आहेत. तर 127 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती आरोग्य विभागानेदिली आहे.

  2. लॉकडाऊनमध्ये शनाया सगळ्यात जास्त काय मिस करतेय?

  3. सरकारनं WhatsApp च्या वापरावर काय नियम घातलेत? , WhatsApp वापरताना काय खबरदारी घ्यायला हवी?

  4. कोव्हिड-19 बरा होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर फिरणाऱ्यास अटक

    कोव्हिड-19 होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर फिरणाऱ्यास व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केली. या व्यक्तीला डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी पुन्हा क्वारंटाईन होण्याची सूचना दिली होती. पण ही सूचना न पाळता सदर व्यक्ती नियम तोडून बाहेर फिरताना आढळली, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

  5. बर्थडे पार्टीला गेलेले 10 जण कोरोनाची लागणच घेऊन आले

  6. मुख्यमंत्र्यांनी केली माध्यमांकडे सहकार्याची विनंती, वृत्तपत्रांचे दारोदारी वितरण न करण्याचे आवाहन

  7. कोरोनाग्रस्त महिलेने दिला बाळाला जन्म

    औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त 33 वर्षीय गर्भवतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात आज एका बाळाला जन्म दिला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

    गरोदर महिलेचे यशस्वी अशी सिझेरियन शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कमलाकर मुदखेडकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कविता जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. पी.एम. कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ डॉ. भारती नागरे व इतरांनी केली. शस्त्रक्रिया गृहामध्येच (ऑपरेशन थिएटर) बाळाचे तीन स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. याच महिलेच्या 15 वर्षीय मुलाची चाचणी काल रात्री (शुक्रवारी) पॉझिटीव्ह आलेली आहे, असं डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं.

  8. मुंबईत दररोज 4 लाख 61 हजार स्थलांतरित कामगारांना जेवणांच्या पाकिटांचा पुरवठा

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या 4 लाख 61 हजार स्थलांतरित कामगारांना जेवणांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात येत असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

    मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांमध्ये मिळून 734 मोफत जेवण वाटप केंद्र कार्यान्वित केली आहेत. ज्यांना आवश्यकता 1800-221292 वर संपर्क साधावा, असं आवाहन पेडणेकर यांनी केलं आहे.

  9. सरकारकडून धान्य वाटपाची गोलमाल आकडेवारी - प्रविण दरेकर

    सरकारकडून धान्य वाटपाची गोलमाल आकडेवारी जाहीर केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेतेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

    महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. सरकार राज्यातील कोटयवधी जनतेची दिशाभूल करत आहे. मुंबईसह राज्यावर कोरोनाचे संकट असताना महाविकास आघाडीचे सरकार खोटी आकडेवारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाठवलेले ट्रक कुठे गेले, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

  10. मुंबईत आज 184 रुग्णांची नोंद, एका दिवसातील सर्वाधिक संख्या

    मुंबईत आज 184 रुग्णांची नोंद झाली. एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

  11. कोरोना व्हायरसविरोधात लढताना बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांची मदत

    कोरोना व्हायरस रोखण्यासाठी काम करत असताना मृत्युमुखी पडलेले सहायक पोलीस आयुक्त अनिल सिंग आणि गुरमेल सिंग यांच्या वारसदारांना 50 लाख रुपये मदत देण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली.

    अशाच प्रकारची नुकसानभरपाई कोरोना व्हायरसविरुद्ध लढताना बळी गेलेल्या इतर कर्मचाऱ्यांसाठीही लागू असेल, असंही त्यांनी सांगितलं.

  12. राज्यात कोरोनाचे एकूण 3648 रुग्ण

    महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3648 वर गेली आहे.

  13. प्लाझ्मा थेरपी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी किती प्रभावी?

    पाहा व्हीडिओ-

  14. दिल्लीतल्या जहांगिरपुरीमध्ये 31 नवे रुग्ण

    दिल्लीच्या जहांगिरपुरीच्या ब्लॉक सी परिसरामध्ये कोरोनाचे 31 नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्व कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका वृद्ध महिलेच्या घरी भेट देणारे किंवा तिचे कुटुंबीय आहेत.

  15. धारावीत 16 नव्या रुग्णांची नोंद

    आज दिवसभरात धारावीमध्ये 16 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आजवर कोरोनाचे 117 रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी 10 रुग्णांनी प्राण गमावले आहेत.

  16. कोरोनाच्या काळात मद्यविक्री सुरू असावी की बंद? मद्यपानावर WHO काय म्हणतं?

  17. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंदर्भात आढावा बैठक

  18. नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 वर

    नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आज 4 ने वाढला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या59 वर पोहोचली आहे. यातील 15 रुग्ण बरे झाले असून इतर 43 जणांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात एकाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

  19. 'हायड्रोक्सिक्लोरोक्विन'च्या वापरावरून मुंबई महापालिका आणि राज्य सरकार आमने-सामने

    'हायड्रोक्सिक्लोरोक्विन’च्या वापराचा मुद्दा येणाऱ्या काळात मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमधील वादाचा मुद्दा बनण्याची दाट शक्यता आहे.हायड्रोक्सिक्लोरोक्विन’ कोरोनाग्रस्त भागात सामान्यांना द्यायचं का नाही, यावरून मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने परस्परविरोधी भूमिका घेतलीये.

    मुंबईतील वाढती कोरोनाग्रस्तींची संख्या लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारनेधारावी, वरळी कोळीवाडा आणि जिजामातानगर या भागात HCQs औषध देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई महापालिकेने या औषधाच्या साईट इफेक्टचं कारण पुढे करत सामान्यांना हे औषध सरसकट न देण्याचा पवित्रा घेतलाय.

    मुंबई महापालिकेचा निर्णय

    याबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “'हायड्रोक्सि-क्लोरोक्विन’ औषध सरसकट सामान्यांना न देण्याचा मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. या औषधाचे साईड इफेक्ट नाकारता येत नाहीत. हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराने ग्रस्त लोकांवर याचे साईड इफेक्ट होऊ शकतात.

    सामान्य मुंबईकरांना या औषधामुळे काही साईड इफेक्ट झाले तर? यासाठी या औषधाचा वापर धारावी, वरळी यासारख्या भागात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीये.

    राज्य सरकारची भूमिका

    मुंबई महापालिकेने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलतानामुख्य सचिवांचे सल्लागार आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्यडॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, “मुंबई महापालिकेने विचारकरून सावध निर्णय घेतला असावा. आता, कोव्हिड-19 बाबत पुढील रणनीती मुंबई महापालिकेला ठरवायची आहे. टेक्निकल एक्सपर्ट म्हणून त्यांनी माझा सल्ला मागितला, तर मी नक्की देईन.”

    कोणत्या भागात दिलं जाणार होतंहायड्रोक्सिक्लोरोक्विन?

    आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी, वरळी-कोळीवाडा आणि जिजामातानगर या भागात हे औषध दिलं जाणार होतं.

    धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचलीये. तर, 10 लोकांचा मृत्यू झालाय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या सर्व्हेक्षणातून 25 लक्षणं नसलेले कोव्हिड-19 रुग्ण आढळून आलेत.

    तर, वरळी कोळीवाडा, जिजामातानगर आणि प्रभादेवीच्या परिसरात 380 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

    काय म्हणाले होते आरोग्यमंत्री राजेश टोपे ?

    “तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार मुंबईत प्रतिबंधात्मक योजना आणि कोरोनाची व्याप्ती रोखण्यासाठी धारावी, वरळी-कोळीवाडा आणि जिजामाता नगर परिसरात दोन लाख लोकांना 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे औषध 15 वर्षाखालील मुलं, हृदय आणि यकृतासंबंधी आजार असलेल्यांना दिलं जाणार नाही.”

    “या औषधामुळे रुग्ण संख्येत घट होईल. आजाराचा संसर्ग आणि संभाव्य गुंतागुंत कमी होईल. रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. राज्य आणि केंद्राच्या संयुक्त समितीने हा निर्णय घेतला आहे,” असंही ते पुढे म्हणाले.

    या भागातच का?

    धारावी, वरळी आणि जिजामातानगर हा परिसर अत्यंत दाट वस्तीचा आहे. एकाच घरात छोट्या खोलीत 8-10 लोक एकत्र राहतात. याठिकाणी सोशल डिस्टंसिंग किंवा फिजीकल डिस्टंसिंग शक्य नाही. स्वच्छतागृह घराबाहेर असल्याने लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करता येत नाही.

    सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याने संसर्ग होण्याचा धोका जास्त वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि संसर्ग रोखण्यासाठी२ लाख लोकांना हे औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

    पालिकेचं म्हणणं काय?

    महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात, जागतिक आरोग्य संघटनेनेहायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषधाला मान्यता दिलीये. मात्र, याचे साईड इफेक्ट होणार नाहीत याचा काही पुरावा नाही. त्यामुळे सद्यस्थितीत हे औषधकोव्हिड-19 रुग्णांची काळजी घेणाऱ्याडॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनाचदिलं जाईल.

    हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या वापराने रुग्णांच्या शरीरातील कोव्हिड-19 व्हायरस कमी होण्यास मदत होते का नाही यावर काहीच पुरावा नाही. अनेक देशांमध्ये या औषधाच्या वापराबाबत रुग्णांवर संशोधन सुरू आहे

  20. नाशिकमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चारने वाढ, एकूण संख्या 74

    नाशिक शहरात आज आणखी 4 कोव्हिड-19 पोसिटीव्ह रुग्ण आढळले. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरील भागात पॉसिटीव्ह सापडलेल्या महिलेचे हे नातेवाईक आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 74 वर पोहोचली आहे.