तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
गाझियाबाद: स्मशानभूमीत स्लॅब कोसळून 23 ठार
दिल्लीजवळच्या गाजियाबादमधील मुरादनगर भागात स्मशानात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
ढिगाऱ्याखाली अजूनही काही दबले असण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आतापर्यंत 23 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले आहेत असं गाजियाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी सांगितलं.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशऩ सुरू आहे. प्रशासनातील अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.
एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली असून, लोकांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यास मदत करत आहे.
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्लॅब कोसळला आणि खाली उभे असलेले लोक त्याखाली अडकले.
पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी हे लोक तिथे उभे होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची माहिती घेतली असून, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत म्हणून जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार होतील याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)