तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
तीन गोष्टींनी जिंकली प्रेक्षकांची मनं आणि पुरस्कारही!
कोरोना काळात प्रेक्षकांना दैनंदिन घडामोडींची माहिती देणाऱ्या 'तीन गोष्टी' या बीबीसी मराठीच्या कार्यक्रमाला प्रतिष्ठेचा WAN-IFRA पुरस्कार जाहीर झाला आहे.
'व्हॅन-आयएफआरए साऊथ एशिया डिजिटल मीडिया' अवॉर्ड पुरस्कारांमध्ये तीन गोष्टी कार्यक्रमाला ऑडियन्स एन्गेजमेंट साठी रौप्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
कोरोना आकडेवारी, निर्बंधांची माहिती, लसीसंदर्भात अपडेट्स, सरकारी उपाययोजना यासह अनौपचारिक पद्धतीने प्रेक्षकांना सामील करून घेत 'तीन गोष्टी' कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
रोज रात्री आठ वाजता फक्त राज्यभरातच नव्हे तर देशविदेशात आवर्जून 'तीन गोष्टी' पाहणारे प्रेक्षक आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान तणावपूर्ण कालखंडात विश्वासार्ह बातम्या, विश्लेषण, आकडेवारी यासह दैनंदिन आयुष्याचा कानोसा घेणारा कार्यक्रम अशी ओळख 'तीन गोष्टी' कार्यक्रमाने निर्माण केली.
भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा आणि नेहा शर्मा यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची एक रात्र असा माहितीपट केला होता.
कडाक्याच्या थंडीत शेतकरी कशा पद्धतीने आंदोलन सुरू ठेवतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो याचा आढावा माहितीपटातून घेण्यात आला होता. या माहितीपटाला 'बेस्ट यूज ऑफ ऑनलाईन व्हीडिओ' गटात कांस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
बीबीसी हिंदीचे ज्येष्ठ पत्रकार रेहान फझल यांची निर्मिती असलेल्या विवेचना कार्यक्रमाला 'बेस्ट पॉडकास्ट प्रोजेक्ट' गटात कांस्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
इतिहास घडवणाऱ्या घटनांचा सखोल मागोवा विवेचना कार्यक्रमात घेण्यात येतो.
कोव्हिड काळात बीबीसीने भारतात केलेल्या वृत्तांकनाला बेस्ट स्पेशल प्रोजेक्ट फॉर कोव्हिड19 गटात कांस्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)