तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. ज्योतिरादित्य सिंदिया पिछाडीवर

    काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  2. नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींनी केले अभिवादन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांनी गांधीनगर येथील निवासस्थानाबाहेर येऊन लोकांना अभिवादन केले.

  3. सुषमा स्वराज यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन

    देशभरात सर्वत्र भारतीय जनता पार्टीला मिळत असेलल्या विजयाबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे देशातील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  4. दिल्लीत भाजप कार्यालयासमोर जल्लोष

    देशभरातील निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपला मिळत असलेल्या मतांमुळे पक्षामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  5. प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी रवाना

    निकालांचे कल समोर येत असताना प्रियंका गांधी राहुल गांधींना भेटण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

  6. स्मृती इराणी 7600 मतांनी आघाडीवर

    अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी 7600 मतांनी आघाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा या मतदारसंघात पराभव झाला होता. अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. राहुल गांधी यावेळेस अमेठीसह केरळमध्ये वायनाड येथूनही निवडणूक लढवत आहेत.

  7. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर

  8. ...या कारणामुळे आम्ही पुन्हा सत्तेत – चिराग पासवान

    नरेंद्र मोदी यांचं नाव आणि एनडीएचं 5 वर्षांतील काम यामुळे आम्ही परत एकदा सत्तेत येत आहोत असं लोक जनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी सांगितलं.

  9. तामिळनाडूत द्रमुकला 22 जागांवर आघाडी

  10. ब्रेकिंग, ब्रेकिंग : गुजरातमध्ये सर्व 26 जागांवर भाजप पुढे

  11. साताऱ्यात उदयनराजे 17,286 मतांनी आघाडीवर

    साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना 93,767 मते

    नरेंद्र पाटील यांना 76,481 मते मिळाली आहेत.

  12. मावळमधून श्रीरंग बारणे 50 हजार मतांनी पुढे

    मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार ही लढत होत आहे. सध्या बारणे 50,000 मतांनी पुढे आहेत.

  13. ब्रेकिंग, ब्रेकिंग : बिहारमध्ये 40 पैकी 38 जागांवर NDA आघाडीवर, 16-भाजप, 16- जेडीयू, 6-लोजपा, 2-आरजेडी

  14. हरियाणामध्ये 10 पैकी 9 जागांवर भाजप आघाडीवर तर एका जागेवर काँग्रेस आघाडीवर

  15. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो आघाडीवर

    केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो पश्चिम बंगालमध्ये आसनसोल मतदारसंघात 21397 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर मूनमून सेन निवडणूक लढवत आहेत.

  16. नागपूरमध्ये नितीन गडकरी 33,333 मतांनी आघाडीवर

    दुसऱ्या फेरीनंतर नागपूरमध्ये नितीन गडकरी 33,333 मतांनी आघाडीवर

  17. आम आदमी पक्षाच्या कार्यालयासमोर शुकशुकाट

    लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. दिल्लीमधील आम आदमी पक्षाच्या कार्यालयासमोर शुकशुकाट दिसत आहे.

  18. वाराणसीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून आघाडीवर आहे. वाराणसी मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.

  19. नागपूर लोकसभा निकाल : नितीन गडकरी की नाना पटोले - कोण बाजी मारणार?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना हरवून लोकसभेत पोहोचलेले नाना पटोले गेल्या निवडणुकीतील 'जायंट किलर' ठरले होते.

  20. ब्रेकिंगः भाजपची 291 जागांवर आघाडी

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने 291 जागांवर आघाडी घेतली आहे.

    काँग्रेस 51 जागांवर आघाडी घेतली आहे.

    तृणमूल काँग्रेसने 25 जागावंर आघाडी घेतली आहे.

    द्रमुकने 22 जागांवर आघाडी घेतली आहे.