तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत, राज्यात एकूण 1761 बाधित

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार?

    कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात यावा, अशी मागणी देशातील बहुसंख्य राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

    सरकार याबाबत विचार करत आहे, अशी बातमी एएनआय वृत्त संस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

    दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करून मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.

    "भारताची परिस्थिती इतर प्रगत देशांपेक्षा नक्कीच चांगली आहे. जर आता हे लॉकडाऊन संपवलं, तर आतापर्यंत जेही कमावलंय, त्यावर पाणी फेरलं जाईल. त्यामुळे लॉकडाऊन वाढवणंच महत्त्वाचं आहे," असंही केजरीवाल म्हणाले.

  2. कोरोनामुळे खचू नका, सरकार प्रयत्न करतेय - शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांचा संदेश

  3. मणिपूरमध्ये एका दिवसासाठी बाजारपेठ खुली

    ईस्टर आणि चैराबो या सणांच्या पार्श्वभूमीवर मणिपूर प्रशासनाने एका दिवसासाठी बाजारपेठ खुली करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सण साजरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठा आणि रस्त्यांवर अशी गर्दी दिसून आली.

  4. धारावीतील नागरिकांची तपासणी सुरू

    मुंबईच्या धारावी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यास आजपासूनसुरुवात झाली. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचं 150 डॉक्टरांचं पथक या कामात मुंबई महापालिकेसोबला सहकार्य करत आहे.

    धारावी ही आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. या भागात कोरोना व्हायरसच्या शिरकावानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

    पण धारावीमध्ये कोरोना व्हायरस घुसला कसा? वाचा ही बातमी

  5. नियम तोडणाऱ्या भाजपा नगरसेवकाला अटक आणि सूटका

    पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांनी लॉकडाऊनचे निर्बंध तोडून वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासह 11 जणांवर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केल्यानंतर काही तासांनी सोडून देण्यात आली.

  6. अमरिंदर सिंग यांनीही केली लॉकडाऊन वाढवण्याची मागणी

    पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा सुरु आहे.

  7. अम्मा कँटिनमधून 11 लाख लोकांना जेवण

  8. लॉकडाऊन वाढवण्याची केजरीवालांची मोदींकडे मागणी

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीय. PTI वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय.

  9. मुंबईतील कलानगर भागात पोलीस तैनात

    मुंबईतील वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेत. या भागात चहावाला कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय.

    कलानगरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान म्हणजेच मातोश्री बंगला आहे.

  10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू

  11. पंतप्रधानांच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पंतप्रधान मोदींशी चर्चा करत आहेत.

    कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चेची शक्यता वर्तवली जातेय.

  12. लॉकडाऊनच्या काळात सुरतमध्ये का भडकली हिंसा?

  13. कोरोनाच्या काळात शेती कशी करायची? जाणून घेऊ महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून

  14. साताऱ्यात कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

    सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील 54 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. श्वसन संस्था संसर्ग आणि मधुमेह आजाराने ही व्यक्ती आजारी पडली होती. त्यानंतर चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

  15. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1666 वर पोहोचली

    महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसतेय. रात्रीत 92 नं रुग्ण वाढले आणि एकूण संख्या 1666 वर पोहोचली.

    • मुंबई महापालिका - 72
    • औरंगाबाद - 2
    • मालेगाव - 5
    • पनवेल - 2
    • कल्याण-डोंबिवली - 1
    • ठाणे महापालिका - 4
    • पालघर - 1
    • नाशिक ग्रामीण - 1
    • नाशिक महापालिका - 1
    • अहमदनगर - 1
    • पुणे महापालिका- 1
  16. लसीकरणाचा 1 हजार वर्षांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? - पाहा व्हीडिओ

    जगात पहिल्यांदा लसीकरण कधी करण्यात आलं? लसीकरणाचा 1 हजार वर्षांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का, लसीचा जन्म नेमका कसा झाला? - पाहा व्हीडिओ

  17. ब्राझिलमध्ये मृतांची संख्या हजाराच्या पार पोहोचली

    ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. ब्राझिलमध्ये कोरोनामुळं आतापर्यंत जवळपास 1068 जणांचा मृत्यू झालाय. तर रुग्णांची एकूण संख्या 19 हजार 789 वर पोहोचलीय.

    ब्राझिलमधील बहुतांश राज्यं लॉकडाऊन आहेत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा विषाणू पसरल्यास कठीण स्थिती निर्माण होईल, अशी भीती ब्राझिलमध्ये व्यक्त करण्यात येतेय.

  18. चीनमध्ये संसर्गाचं प्रमाण पुन्हा वाढलं

    चीननं कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याचं दिसत असलं, तरी नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण काही कमी झालं नाहीय. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार, शुक्रवारी 46 नवे रुग्ण सापडले, तर गुरुवारी 42 रुग्ण सापडले होते. म्हणजेच दिवसागणिक पुन्हा रुग्ण वाढताना दिसतायेत. शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांपैकी 34 रुग्णांमध्ये लक्षणं सुद्धा दिसून आली नव्हती.

  19. कोरोना व्हायरसच्या उच्चाटनासाठी चीनकडून दडपशाही?

    कोरोना व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात चीनमधून झाली. आता चीनमधे याच्या संसर्गाचा वेग मंदावलाय. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीन सरकारच्या प्रयत्नांचं जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केलंय. पण खुद्द चीनच्या अंतर्गत भागात वेगळीच परिस्थिती आहे. तिथले लोक चीनने राबवलेल्या उपायांवर नाराज आहेत. पाहा व्हीडिओ-

  20. अकोल्यात कोरोनाच्या संशयित रुग्णाची आत्महत्या

    अकोल्यात कोरोनाच्या संशयित रुग्णानं आत्महत्या केलीय.

    अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून 7 एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज (11 एप्रिल) पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आला. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

    अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी ही माहिती दिली.

    आसाममधील नागाव जिल्ह्यातील हा रुग्ण होता. कालच त्याच्या चाचणीचा अहवाल आला होता. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं होतं.