तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

लॉकडाऊनसंदर्भात राज्य सरकारची नवी नियमावली

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. दिल्लीत 2 पोलिसांना कोरोनाची लागण, 26 पोलीस क्वारंटाईनमध्ये

    राजधानी दिल्लीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही पोलिसांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 26 पोलीस कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

  2. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाचा दिलासा

    घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये- गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना सूचना

  3. इक्वेडोरमध्ये मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची धडपड- पाहा व्हीडिओ

    ही दृश्य तुम्हाला कदाचित विचलित करू शकतात.

  4. आंध्रप्रदेशात 572 कोरोनाबाधित

    आंध्रप्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 572 वर पोहोचली आहे, अशी माहिती तिथल्याआरोग्य विभागाने दिली आहे. त्यापैकी 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

  5. कर्नाटकातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 353वर

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशभरात हळूहळू वाढताना दिसत आहे. कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शुक्रवार दुपारपर्यंत 353वर पोहोचला आहे. यापैकी 82 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

  6. गुजरातमध्ये कोरोनाचे 1 हजारहून अधिक रुग्ण

    गुजरातमध्ये कोरोनाचे नवीन 92 रुग्ण आढळले आहेत, यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 21 झाली आहे.

  7. भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांचा कोरोनामुळे मृ्त्यू

    मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 160 वर पोहोचली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेले पाचही जण भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडित आहेत.

    भोपाळमध्ये 2-3डिसेंबर 1984ला झालेल्या गॅस दुर्घटनेत हजारो जणांचा जीव गेला होता. याशिवाय हजारो लोकांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाली होती.

    या आजारांशी ही माणसं कशीतरी का होईना पण लढत होती, पण शेवटी यापैकी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  8. काश्मीरमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी होत आहेत नवीन प्रयोग

  9. फी भरण्याबाबत पालकांवर सक्ती करू नये - शालेय शिक्षण विभाग

  10. तबलीगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगची केस

  11. वुहानमध्ये मृतांच्या संख्येत 45 टक्क्यांनी वाढ

  12. धारावीत कोरोनाचे 86 रुग्ण

    या योजनेविषयी सविस्तर इथं वाचा - https://ndjeirbsjao.shop/marathi/india-52310724%3C/a%3E%3C/p%3E%3C/div%3E%3C/div%3E%3C/article%3E%3C/li%3E%3Cli class="css-xxlek1">

    देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ 7.4 टक्क्यांनी होईल- शक्तिकांत दास

  13. कोरोनाला थांबवणाऱ्या 3 मॉडेल्सची गोष्ट

  14. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं पडणार महागात

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं आता सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका अधिक वाढत असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

    देशातील वेगवेगळ्या नगरपालिकांनी यापूर्वीच थुंकण्यावर बंदी घातली आहे. मात्र लोक त्याकडे पुरेशा गांभीर्यानं पाहत नसल्यानं गृह मंत्रालयानं केंद्रीय अधिनियमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातलीये.

    अनेक राज्यांनीही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडाची तरतूद केलीये. मुंबईमध्ये जर कोणी सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलं तर संबंधित व्यक्तीला हजार रुपयांचा दंड आकरण्यात येत आहे. तर दिल्लीमध्ये यासाठी दोन हजार रुपयांचा दंड आहे.

  15. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजारहून अधिक रुग्ण

    भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 13 हजार 387 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत देशातील 437 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    गेल्या 24 तासात देशात 1 हजार 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती जाहीर केली आहे.

  16. कोरोनामुळे मुलाचा वाढदिवस साजरा करायला कुणीच आलं नाही, असं एका वडिलांनी म्हटलं आणि...

    अमेरिकेत एका व्यक्तीनं पोलिसांना फोन करून सांगितलं की, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि कोरोनामुळे तो साजरा करायला कुणीच आलेलं नाही.

    त्यानंतर काही क्षणात पोलिसांच्या गाड्या या व्यक्तीच्या घरासमोर आल्या आणि त्यांना हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा कशापद्धतीनं दिल्या ते पाहा.

  17. चीनचा जीडीपी 7 टक्क्यांनी खालावला

    चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित चीनच्या जीडीपीमध्ये (सकल राष्ट्रीय उत्त्पन्न) 6.8 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

    चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचं गेल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदाच समोर आलं आहे, असं शुक्रवारी सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येतं.

  18. कोरोना व्हायरसचा मुकाबला 'हे' तीन पॅटर्न करतील का?

    देशातली सर्वांत पहिली कोरोनाची केस केरळमध्ये सापडली. देशातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 10 हजाराहून अधिक झाली आहे. पण केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 400 हून अधिक नाही.

    सर्वात आधी कोरोनाचे पेशंट सापडलेल्याकेरळमध्ये स्थिती नियंत्रणात कशी आली हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. केरळनं केलेल्या उपाययोजना 'केरळ मॉडेल' म्हणून ओळखल्या जात आहेत.

    पण त्याचबरोबर देशात आणखी दोन मॉडेल्सची चर्चा आहे. भिलवाडा आणि आग्रा. यांना भिलवाडा पॅटर्न किंवा आग्रा पॅटर्नही म्हटलं जात आहे.

    केरळ, भिलवाडा आणि आग्रा या ठिकाणी कोरोना आटोक्यात कसा आला? हाच पॅटर्न आपल्याला देशभरात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात राबवता येणार नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.