तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 हजारांहून अधिक

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33050 वर

    देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 1718 ने वाढली. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33050 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    गेल्या एका दिवसात 67 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत देशात 1074 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 8325 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  2. ट्रंप यांच्या अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती का बिघडली? #सोपीगोष्ट 67

  3. लॉकडाऊन कालावधीत नियम मोडल्याप्रकरणी 83 हजार 156 गुन्हे दाखल, 16 हजार 897 जणांना अटक

    कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या कालावधीत प्रशासनाने घातलेले नियम मोडल्याप्रकरणी राज्यात आतापर्यंत सुमारे 83 हजार 156 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 16 हजार 897 जणांना अटक करण्यात आली आहे. याअंतर्गत 2 कोटी 94 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

    या दरम्यान अवैध वाहतूक करणाऱ्या 1114 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 49 हजार 802 वाहनं जप्त करण्यात आली. तर परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या 15 गुन्ह्यांची नोंदही यावेळी करण्यात आली.

  4. 'हे' औषध कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडेल?

  5. बसने मजुरांचं स्थलांतर अशक्य, विशेष रेल्वेच हवी - नवाब मलिक

    स्थलांतरित मजूरांची त्यांच्या राज्यातील रवानगी बसने करण्याची सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना केली आहे. पण केंद्राच्या या गाईडलाईन्समध्ये अनेक त्रुटी आहेत. बसने मजुरांचं स्थलांतर अशक्य असून त्यासाठी विशेष रेल्वेच हवी, असं वक्तव्य कौशल्य विकास व अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.

    स्थलांतरित मजुरांना सोडण्याच्या केंद्राच्या घोषणेनंतर लोकांच्या मनात निर्माण झालेली चलबिचलसुद्धा आम्हाला अडचणीची ठरू शकते. हा खर्चिक विषय आहे. केंद्रानं त्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा कार्यक्रम जाहीर करावा. विविध जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी 8 दिवसांमध्ये दिलासा नक्की मिळेल, असं मलिक म्हणाले.

    राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार केलं नाही तर आम्ही पुन्हा त्यांना शपथ देऊ. लॉकडाऊन असला तरी एका मेसेजमध्ये सर्व आमदार जमतील. भाजपमध्ये गेलेले लोक आता परत येण्यासाठी आम्हाला विचारत आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.

  6. अमेरिकेत 24 तासांमध्ये 2502 लोकांचा मृत्यू

    अमेरिकेत कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 2502 लोकांचे प्राण गेले आहेत.

  7. सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81 वर

    सोलापुरातील कोरोना व्हायरसग्रस्तांच्या संख्येत बुधवारी 13 ने वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 81 वर पोहोचली आहे.

    सोलापुरात पहिला रुग्ण 12 एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर सोलापुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 18 दिवसांतच या संख्येने 80 चा टप्पा ओलांडला आहे.

  8. भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी आहे - जयंत पाटील

  9. जर्मन नागरिकांना मायदेशात परत नेणारा मराठी पायलट

  10. कोरोना व्हायरसचा जन्म नेमका कुठे आणि कसा झाला?

  11. गुड मॉर्निंग

    नमस्कार मंडळी,

    कोरोना आणि लॉकडाऊन संदर्भात आपण गेले काही दिवस अशा Live page मधून ताज्या घडामोडी देत आहोत

    कालपर्यंत जगभरात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 30 लाखांवर गेल्याचं दिसून आलं. जगभरात या व्हायरसमुळे 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

    भारतात आतापर्यंत 22,982 रुग्ण आढळले असून 1008 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

    आपण काल घडलेल्या सर्व घडामोडी इथं क्लिक करुन वाचू शकता.