तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये 17 मेपर्यंत फक्त दवाखाने सुरू राहणार
उड्डाणपूर्व आरोग्य चाचणीमध्ये मुंबईतील 5 वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व एअर इंडियाचे वैमानिक आहेत.
लाईव्ह कव्हरेज
R0 म्हणजे काय? कोरोना लॉकडाऊन उठवण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा का?, जेम्स गॅलागर, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी एक आकडा अतिशय महत्त्वाचा आहे.
जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.
हा आकडा आहे - बेसिक रिप्रॉडक्शन नंबर. म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा. याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट (0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा-
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातला बेरोजगाराची दर 23 टक्क्यांवर पोहोचला
घरातलं अन्न संपलं म्हणून तिच्यावर मुलांसाठी दगड शिजवण्याची वेळ आली
कोरोना व्हायरसमुळे केनियातल्या एका महिलेवर अतिशय बिकट प्रसंग ओढवला.
मुलांना खायला घालण्यासाठी काहीच नसल्यामुळे या महिलेला मुलांच्या समाधानासाठी दगडं शिजवण्याचं नाटक करावं लागलं. आठ मुलांची आई असलेल्या या महिलेचं नाव आहे पेनिना बहाती कित्साओ.
पेनिना निरक्षर आणि विधवा आहेत. त्या लोकांचे कपडे धुतात आणि त्याद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पण, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे त्यांचं काम थांबलं.
पेनिना यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली की मुलांना खाऊ घालायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे मग मुलांच्या समाधानासाठी त्यांनी दगडं शिजवायला सुरुवात केली.
कोव्हिड-19 आजारातून बरं व्हायला किती वेळ लागतो?
'कोरोनाविरोधातल्या माझ्या लढाईला यश, घरी सुखरूप परतलो'
यंदा 6 जून रोजी सोहळा होणार?
कोरोनावरची लस शोधण्यात भारताचं योगदान किती? देशात कुठे-कुठे सुरू आहे संशोधन?
बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त
बुलडाण्यात आज शेवटच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देऊन जिल्हा कोरोनामुक्त झालाय. शेवटच्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. आज या तीनही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त झालाय.
ब्रेकिंग, एअर इंडियाच्या 5 वैमानिकांना कोरोनाची लागण
उड्डाणपूर्व आरोग्य चाचणीमध्ये मुंबईतील 5 वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व एअर इंडियाचे वैमानिक आहेत. त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती.
तुर्कस्तानचे डाॅक्टर 24 दिवस घरीच गेले नाहीत
रोगप्रतिकारशक्ती वाढवायला व्हिटामिन्स, हस्तमैथुन, ग्रीनटी: काय करावं, काय करू नये?, जारिया गोवेट, बीबीसी फ्युचर
कोरोना व्हायरसमुळे होणारा कोव्हिड-19 कोणत्या औषधाने बरा होईल, याचा शोध जगभरातले संशोधक घेत आहेत.
ज्या लोकांचीप्रतिकारक्षमताचांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच कायतेआतापर्यंत लक्षात आलं आहे. याचंच भांडवल आता आपलीबाजारपेठसुद्धाकरू पाहात आहे.
प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.
अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात. 1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हासुद्धा अशाचप्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- अफवा आणि रोगप्रतिकारक्षमता
हात धुण्यासाठी 8 वर्षाच्या स्टिफनने लावला हा भारी शोध
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील उपचार पूर्ण
कोरोनाची लागण झाल्यामुळे करण्यात आलेले उपचार आता पूर्ण झालेले असून आपण आता घरी जात असल्याचे ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
'लोकल आता पूर्वीसारखी लोकांनी खचाखच भरलीये आणि आपण ऑफिसला जातोय असं आता होणार नाही'
हे लक्षात आहे ना?
कोरोना व्हायरससंबंधी संशोधन करणाऱ्या चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या एका चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. या मृत्यूवरून जगभरात 'कॉन्स्पिरसी थेअरीज' म्हणजेच षड् यंत्राच्या कहाण्यांचं पेव फुटलं आहे.
37 वर्षांचे प्रा. बिंग ली शनिवारी (2 मे) अमेरिकेतल्या पीट्सबर्ग शहरातल्या आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. ते युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्गमधल्या स्कूल ऑफ मेडिसीन विभागात सहप्राध्यापक होते.
प्रा. बिंग ली कोव्हिड-19 आजारासंबंधी एक महत्त्वाचं संशोधन पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, असं त्यांच्या सहकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा खून झाल्याची बातमी आली. या प्रकरणात दोघांचा जीव गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एकाची हत्या झाली तर दुसऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
लॉकडाऊनमध्ये वेळ कसा घालवताय? पाहा ही आज्जी काही टिप्स सांगतेय...
भारतीय नौदलाने मालदिवमधून 698 भारतीयांना परत आणले
भारतीय नौदलाने मालदिवमधून 698 भारतीयांना परत आणले असून त्यामध्ये 19 गर्भवतींचा समावेश आहे.
कोरोनाचे सौम्य, मध्यम तीव्रतेचे रुग्ण विनाचाचणी घरी जाऊ शकतील- केंद्र सरकार