बिहार एक्झिट पोल : तेजस्वी आणि नितीश यांच्यामध्ये अटीतटीची लढत
बिहार विधानसभा निवडणुकीचे 5 एक्झिट पोल्स आणि त्यांचे 5 अर्थ क्लिक करा आणि पाहा व्हीडिओ...
तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे 5 एक्झिट पोल्स आणि त्यांचे 5 अर्थ क्लिक करा आणि पाहा व्हीडिओ...
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना क्रिकेटपटू बनायचं होतं, मात्र क्रिकेट विश्वात ते फारसे गाजले नाहीत. त्यांच्याकडेवडिलांचा राजकीय वारसा आहेआणि त्याच्याच आधारे ते नेते बनले आहेत.आपल्याला क्रिकेट खेळण्याची आवड एवढी होती की नववीनंतर आपण शिक्षणच सोडलं, असं तेजस्वी सांगतात.इथंक्लिक करा आणि जाणून घ्या तेजस्वी यादव यांच्याबद्दलची इत्यंभूत माहिती...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पटना येथे सकाळी सातच्या सुमारास मतदान कक्षं उघडण्यात आली. संपूर्ण राज्यात सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले होते. यामध्ये तेजस्वी यादव आणि नितिश कुमार यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसून आलं. अनेकांनी तर तेजस्वी यादव पुढे असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
त्यामुळे या निकालाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. याबाबत सविस्तर बातमी तुम्ही या लिंकवर बिहार विधानसभा निवडणूक: एक्झिट पोल दाखवतात तेजस्वी आणि नितीश यांच्यामध्ये अटीतटीची लढतवर क्लिक करून वाचू शकता.
हे सर्व पोल इतर विविध संस्थांनी घेतले आहेत. बीबीसीने कोणताही एक्झिट पोल घेत नाही.
नमस्कार, सुप्रभात.
बीबीसी मराठीच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपलं स्वागत...
बिहार निवडणुकीच्या निकालासंदर्भात हे लाईव्ह पेज आहे. इथं तुम्ही दिवसभरातील सगळ्या घडामोडी जाणून घेऊ शकता. बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडल्यानंतर सगळ्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. निवडणुकीसाठीची मतमोजणी आज (मंगळवार, 10 नोव्हेंबर) होणार आहे.
सकाळी 8 वाजता बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. आज संध्याकाळपर्यंत बिहारची सत्ता कुणाच्या हातात जाईल, हे स्पष्ट होणार आहे.
यंदाची निवडणूक ही अत्यंत निर्णायक असल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (संयुक्त) आणि भारतीय जनता पक्षाच्या NDA ला तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनने तगडं आव्हान निर्माण केलं आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर नशीब आजमावत असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याची उत्सुकता आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. भारतात कोरोना साथ सुरू असताना निवडणूक घेण्यात आलेलं बिहार हे पहिलंच राज्य आहे.
इथं तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आलं. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी 71 जागांसाठी मतदान घेण्यात आलं, दुसरा टप्पा 3 नोव्हेंबर रोजी 94 जागांसाठी पार पडला. तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांसाठी मतदान झालं होतं.