तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अमेरिका निवडणूक निकाल : कोण होणार राष्ट्राध्यक्ष?
डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे लवकरच कळणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीत 'स्विंग स्टेट्स'ची भूमिका ही महत्त्वाची समजली जाते.
लाईव्ह कव्हरेज
ट्रंप विरुद्ध बायडन : कोणत्या राज्यात आघाडी?
आतापर्यंत 50राज्यांपैकी 19 राज्यांतले कलसमोर येत आहेत. साउथ कॅरोलिना राज्यात ट्रंप विजयी होतील, हे अनुमान आहे. त्याचसोबत अलाबामा, नॉर्थ डाकोटा, साउथ डाकोटा राज्यातही ट्रंप यांच्या विजयाचं अनुमान आहे.
दुसरीकडे बायडन हे कनेक्टिकट, न्यूयॉर्क, कोलोरोडो राज्यांमध्ये बायडन विजयी होतील असा कल आहे.
डेलावेअरमधून पहिल्यांदाच ट्रान्सजेन्डर सिनेटर विजयी
डेलावेअरमधून पहिल्यांदाच ट्रान्सजेन्डर सिनेटर निवडून आल्याचं वृत्त AP आणि CBC नं दिलं आहे. सारा मॅकब्राइड या डेलावेअरमधून सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत.
त्यांनी ओबामा प्रशासनात इंटर्न म्हणून काम केलं होतं. त्यांनी कायमच एलजीबीटी समुदायाच्या हक्कांचं समर्थन केलं आहे.
LGBTQ Victory Fund च्या अध्यक्षा अॅनिस पार्कर यांनी मॅकब्राइड यांचा विजय हा अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तिंसाठी प्रेरणादायी ठरेल असं म्हटलं आहे.
निकालाच्या या आहेत 3 प्रमुख शक्यता
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. काही राज्यांत बायडन आघाडीवर आहेत, तर काही ठिकाणी ट्रंप आघाडीवर आहेत.
अतिशय चुरशीची अशी लढत सुरू आहे. निकालाचे अंदाज काय आहेत? निकालानंतर काय होऊ शकतं? निकालानंतरच्या 3 शक्यता काय आहेत? जाणून घेऊया सोपी गोष्टमधून...
डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने कोणत्या राज्यांचा कल?
डोनाल्ड ट्रंप हे टेनेसीमधून विजयी होत असल्याचं अनुमान आहे.
बिल क्लिंटन यांच्यानंतर टेनेसीनं कायमच रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारालाच मतं दिली आहेत. 2016मध्ये ट्रंप हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा 26 पॉइंट्सनं आघाडीवर होते.
वेस्ट व्हर्जिनियामधूनही ट्रंप यांच्या विजयाचं अनुमान आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये या राज्यानं रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनेच कौल दिला आहे.
अर्कान्सासमध्येही ट्रंप विजयी होतील असं अनुमान आहे.
अमेरिका निव़डणूक : आतापर्यंत काय काय घडलं?
- राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 50 राज्यांतील मतदान केंद्रांवर नऊ वेगवेगळ्या टाइमझोननुसार मतदान सुरू झालं.
- अमेरिकेतली बहुतांश राज्यांमधील मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. या राज्यांमध्ये एकूण 238 इलेक्टोरल वोट्स आहेत.
- अमेरिकन वेळेनुसार रात्री आठ वाजेपर्यंत अलाबामा, कनेक्टिकट, डेलावेअर, फ्लोरिडा, इलिनॉयस, मेरिलँड, मेसेच्युसेट्स, मिसिसिपी, मिझोरी, न्यू हॅम्पशायर, न्यू जर्सी, ओक्लाहामा, पेन्सिल्वेनिया, ऱ्होड आयलंड आणि टेनेसीमधली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
- एका आशियाई-अमेरिकन रिपब्लिकन गटानं अधिकृतरित्या डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना समर्थन दिलं आहे. या गटानं आपल्या हजारो सदस्यांना बायडन यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
- उत्तर कॅरोलिनामधले निकाल 45 मिनिटं उशीरा येऊ शकतात, कारण इलेक्शन बोर्डानं तांत्रिक कारणामुळे चार मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया उशीरा सुरू केली होती.
डोनाल्ड ट्रंप यांना पुन्हा संधी मिळेल?
अवघ्या काही तासांत आपल्याला कळेल की अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे. एका बाजूला आहेत सक्रीय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन.
कोण जिंकेल? बायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
ब्रेकिंग, 'या' राज्यांचा कल जो बायडन यांच्या बाजूने
जो बायडन हे व्हर्मोन्टमधून विजयी होतील असं अनुमान आहे. हे राज्य डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानलं जातं.2016 साली हिलरी क्लिंटन यांना इथून 56 टक्के मतं मिळाली होती.
या राज्यात इलेक्टोरल कॉलेजची तीन मतं आहेत.
डेलावर, मेरिलँड, मॅसेच्युसेट्स आणि न्यू जर्सी या राज्यांमधूनही जो बायडन हे विजयी होत असल्याचा सुरूवातीचा कल आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांच्या या आहेत तीन शक्यता
ब्रेकिंग, ट्रंप इंडियानामधून जिंकण्याचं अनुमान
इंडियानामधून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप विजयी होत असल्याचा अंदाज आहे. हे राज्य उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचं गृहराज्य आहे आणि इथून सहसा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवारच विजयी झाल्याचं पहायला मिळतं.
मात्र, 2008 साली इंडियानामधून बराक ओबामा विजयी झाले होते.
इंडियानामध्ये इलेक्टोरल कॉलेजची 11 मतं आहेत.
पाच राज्यांत 2016 च्या तुलनेत जास्त मतदान
यावेळी अमेरिकेत विक्रमी मतदानाची चर्चा सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामधील प्राध्यापक मायकल मॅकडोनाल्ड सांगतात की, ओरेगन अमेरिकेतली पाचवं राज्य आहे, जिथे 2016 च्या तुलनेत जास्त मतदान झालं आहे.
टेक्सास, हवाई, मोंटाना, वॉशिंग्टन आणि आता ओरेगन इथं मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला. टेक्सासमध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यामध्ये चुरशीची लढत असल्याचं सांगितलं जातंय.
सुरूवातीच्या टप्प्यात 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी मतदान केल्याचं सांगितलं जातंय.
कोणीही आपल्यात फूट पाडू शकत नाही- कमला हॅरिस
मतदानादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्वीट करून म्हटलं, “आपण कोठून आलो आहोत आणि कोठे राहतो, याला फारसं महत्त्व नसतं हे जो बायडन यांना ठाऊक आहे. आपला वंश, लिंग, पार्श्वभूमी आणि धार्मिक श्रद्धा यांनीही काही फरक पडत नाही. तुमची ओळख काय आहे आणि तुम्ही कोणावर प्रेम करता या गोष्टीही तशा निरर्थक आहेत. तुमचे पूर्वज कोणती भाषा बोलायचे, यानेही फरक पडत नाही. या सगळ्या गोष्टींचा वापर करून कोणीही आपल्यामध्ये फूट पाडू शकत नाही.”
अमेरिका निवडणुकीचा निकाल कधीपर्यंत लागणार?
अमेरिका निवडणूक निकाल : कोण होणार राष्ट्राध्यक्ष?