ब्रेकिंग, वाहन मिळालं नाही तर पायी निघा, खारकीव्हमधल्या भारतीयांसाठी नवीन ॲडव्हायजरी
युक्रेनमधल्या खारकीव्ह शहरात असणाऱ्या भारतीयांसाठी एक नवीन ॲडव्हायजरी जाहीर करण्यात आली आहे. वाहन मिळालं नाही तर पायी शहरातून बाहेर पडा, असं सांगण्यात आलंय.
युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने म्हटलंय. "बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेत लोकांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ, पुन्हा सांगतो तात्काळ खारकीव्ह सोडावं. त्यांनी पेसोचिन, बाबाई आणि बेझ्लेयुदिव्काकडे शक्य तितक्या लवकर जावं.
"ज्या विद्यार्थ्यांना वाहनं किंवा बस किंवा रेल्वे मिळत नसेल त्यांनी पायी पेसोचिन (11 किमी), बाबाई (12 किमी) आणि बेझ्लेयुदिव्का (16 किमी) जावं.
"लगेच निघा. कोणत्याही परिस्थितीत भारतीयांनी या ठिकाणी आज युक्रेनी वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे."