भाजपची टीका, दिया मिर्झाचा फटाक्यांवरचा व्हीडिओ BMC ने हटवला
दिवाळी साजरी करताना फटाके टाळण्याचं आवाहन करणारा दिया मिर्झाचा एक व्हीडिओ मुंबई महापालिकेने पोस्ट केला होता, पण भाजपच्या टीकेनंतर हा व्हीडिओ आता डिलिट झालाय.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी ट्वीट करत म्हटलं की दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नको आहेत. आमच्या परंपरा आमच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत विविध सेलिब्रिटींनी केलेली आवाहनं पाहायला मिळतात. यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी मनाई असल्याचं लिहिलंय आणि सोबतच सेलिब्रिटींनी केलेले आवाहनांचे व्हीडिओ आहेत.
दिया मिर्झाचा व्हीडिओ 1 नोव्हेंबरला पोस्ट करण्यात आला होता, पण तो आता डिलीट केला गेलाय. यापूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी अशीच आवाहनं केली आहेत, त्याचे व्हीडिओ मात्र अजूनही MyBMC X हँडलवर शाबूत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



