तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
मेट गाला 2026 मध्ये आकर्षक पेहरावासह सेलिब्रिटींचा सहभाग, 'या' भारतीयांनीही वेधलं लक्ष
फॅशन जगतातील 'सर्वात मोठी रात्र' असा नावलौकिक असलेल्या 'मेट गाला'चा इव्हेंट नुकताच पार पडला. मेट गालाच्या इव्हेंटमध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभाग घेतात.
नाविन्यपूर्ण वेशभूषा करा, विविध प्रयोग करा असे आवाहन आयोजकांनी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींना केले होते.
त्यानुसार सेलिब्रिटींनी हटके अंदाजात या कार्यक्रमात सहभाग घेतला. मेट गालाचा फॅशन शो हा एक चॅरिटी इव्हेंट असतो. यातून जो निधी उभा केला जातो तो मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इंस्टिट्यूटला दिला जातो.
या सोहळ्यात नेमकं कोण कोण आलं आणि त्यांच्या वेशभूषेनी कसं सर्वांना आकर्षित करून घेतलं ते आपण या फोटो गॅलरीतून पाहू.
बियॉन्से ही अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका आहे. फ्रेंच डिजायनर ओलिव्हिएर राउस्टिंगने बनवलेल्या गाऊनमध्ये तिने मेट गालात सहभाग घेतला.
बियॉन्सेनी पती आणि मुलीसह मेट गालात सहभाग घेतला. बियॉन्सेचा पती जे झी हा प्रसिद्ध गायक-रॅपर आहे. तर त्यांची मुलगी ब्लू एव्ही कार्टर ही देखील गायिका आहे.
सुपर मॉडल हिदी क्लमच्या पोशाखामुळे सर्वच जण आश्चर्य चकित झाले. हिदी क्लमने संगमरवरी मूर्तीसारखा पोशाख परिधान केला होता. तिचा हा पोशाख इव्हेंट आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
या सोहळ्यात भारतीयांनी देखील सहभाग नोंदवला. प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा देखील या सोहळ्यात दिसला.
मनिष मल्होत्राने आपल्या पोशाखातून मुंबई शहराला अभिवादन केले. त्याचा हा पोशाख बनवण्यासाठी 50 जणांची टीम काम करत होती आणि हा पोशाख बनवण्यासाठी एकूण 960 तास लागले.
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करन जोहरने देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला.
मनिष मल्होत्रानो डिझाइन केलेल्या पोशाखात करन जोहर दिसला. या पोशाखेच वैशिष्ट्य म्हणजे या पोशाखावर भारतीय पौराणिक कथांमधील चित्रं होती आणि ती हाताने काढलेली होती.
भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
हैदराबादस्थित उद्योजिका सुधा रेड्डींनी देखील देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
भारतीय उद्योजिका अनन्या बिरला यांनी देखील मेटगालात सहभाग नोंदवला.
अनन्या बिरला यांनी घातलेल्या मास्कची चर्चा होती.
भारतीय सुपर मॉडल भाविता मंडावाने मेट गालामध्ये सहभाग नोंदवला.
नाट्यसृष्टीतील एक मोठे नाव जॉर्डन रॉथ यांच्या या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
किम कर्दाशियनने फायबर ग्लास ब्रेस्ट प्लेट परिधान केली होती. या पोशाखाचं वैशिष्ट्य म्हणजे एका गॅरेजमधून हे किम कर्दाशियनने हा पोशाख बनवून घेतला.
प्रसिद्ध गायिका केटी पेरी ही मास्क असलेला पोशाख परिधान करुन आली होती.
गायक सॅम स्मिथ
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)