तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये 60.68 टक्के मतदान

मुंबईच्या 6 जागा, याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या जागांवर मतदान पार पडलं.

लाईव्ह कव्हरेज

  1. मतदान आणि सेल्फी

    मतदानानंतर लोकांना सेल्फीचा मोह आवरत नाही. मुलूंडच्या वाणी महाविद्यालयाबाहेर गाला कुटुंबियां मतदान केल्यानंतर अशी पोझ दिली.

  2. अमोल कोल्हेंनी केले मतदान

    शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी नारायणगाव कोल्हे मळा या ठिकाणी मतदान केलं.

  3. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या रांगा

    मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी त्याचा आढावा घेतला आहे.

  4. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे सहकटुंब मतदान

  5. जितेंद्र आव्हाडांचे मुलगी नताशासह मतदान

  6. उद्धव ठाकरेंचे सहकुटुंब मतदान

  7. राहुल शेवाळे यांनी केलं मतदान

    मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसनेतर्फे निवडणूक लढवणाऱ्या राहुल शेवाळे यांनी सकाळी मतदान केलं. 2014 च्या निवडणुकीत ते याच मतदारसंघात विजयी झाले होते.

  8. प्रिया दत्त यांनी केलं मतदान

    मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या प्रिया दत्त यांनी सकाळी मतदान केलं. गेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या पूनम महाजन यांनी पराभव केला होता. यावेळेस पुन्हा एकदा दोघींंमध्ये लढत होत आहे.

  9. 'आघाडीचं सरकार आलं तरी त्याने देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत'

  10. 'साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीला विरोध'

    साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देणं हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. पण साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही विरोध केला होता. यामुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं - रामदास आठवले

  11. सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 18.39 टक्के मतदान

  12. कंगना रणावतने केलं मतदान

  13. 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 34.71 टक्के मतदान

    पश्चिम बंगालमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 34.71 टक्के मतदान झालं आहे. तर ओडिशामध्ये 17 टक्के मतदान झालं आहे.

    ओडिशात 6 मतदारसंघांत तर पश्चिम बंगालमध्ये 8 मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे.

  14. राज ठाकरे बालमोहन विद्यामंदिरात मतदान करण्यासाठी दाखल

  15. पार्थ पवारांच्या भेटीगाठी

    मावळ मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. त्यांनी 23 एप्रिललाच काटेवाडीमध्ये त्याचं मतदान केलं आहे.

  16. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे मतदान प्रक्रिया

  17. दिंडोरीत वाजत-गाजत मतदान

  18. कुर्ल्यात विकलांग नागरिकांची गैरसोय

  19. ज्येष्ठ नागरिकांचं असंही मतदान

  20. लोकशाही एक गिफ्ट आहे, ते सांभाळणं खूप गरजेचं आहे - सोनाली बेंद्रे