तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये 60.68 टक्के मतदान
मुंबईच्या 6 जागा, याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या जागांवर मतदान पार पडलं.
लाईव्ह कव्हरेज
काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांची मोदी आणि शाहांविरोधात तक्रार
भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी, विजय गोयल आणि अनिल बालुनी निवडणूक आयोगालाची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.82 टक्के मतदान
महाराष्ट्रात 17 लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.82 टक्के मतदान झालं आहे.
मध्यप्रदेशात सरासरी 11.11 टक्के, ओडिशामध्ये 9 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 16.90 टक्के मतदान झालं आहे.
आमिर खान आणि किरण राव यांचे मतदान
शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मतदान
शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदान केलं. यावेळी समवेत पत्नी कल्पना, मुलगा अक्षय आणि अपूर्व आणि स्नुषा माधुरी (अक्षय यांच्या पत्नी)
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी
नंदुरबार- 8.73 टक्के
धुळे- 6.31 टक्के
दिंडोरी- 7.28 टक्के
नाशिक- 6.69 टक्के
पालघर- 7.86 टक्के
भिवंडी- 6.21 टक्के
कल्याण- 5.00 टक्के
ठाणे- 6.77 टक्के
मुंबई उत्तर- 7.85 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम- 6.90 टक्के
मुंबई ईशान्य- 7.00 टक्के
मुंबई- उत्तर मध्य- 5.98 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 6.45 टक्के
मुंबई दक्षिण- 5.91 टक्के
मावळ-6.67 टक्के
शिरूर-7.07 टक्के
शिर्डी- 7.28 टक्के
यंदा दुप्पट लिड घेऊन जिंकणार - राजन विचारे
ठाण्याचे खासदार राजन विचारे ठाण्यातील जॉन बॅप्टिस्ट शाळेत मतदानासाठी हजर झाले आहेत. शिवसेनेतर्फे विचारे यांना ठाण्यातून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे निवडणूक लढवत आहेत.
विचारे यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा पराभव केला होता. 2008-09 या कालावधीत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आनंद परांजपे यांनी केले होतं. त्यानंतर 2009 ते 2014 या कालावधीत परांजपे कल्याण मतदारसंघाचे खासदार होते. 2014 साली त्यांचा शिवसेनेच्या श्रिकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये पराभव केला होता.
"गेल्यावेळी दोन लाख एक्याऐंशी मतांचा मला लिड होता. या वेळेला हा लिड दुप्पट होईल असं मला वाटतं," असं मत राजन विचारे यांनी व्यक्त केलं आहे.
मध्य प्रदेशात शाहडोलमध्ये 90 वर्षांच्या आजीबाईंनी मतदान केलं
'मुंबई शहर' जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत झालेले मतदान
मुंबई दक्षिण मध्य- 6.77 टक्के
मुंबई दक्षिण- 5.55 टक्के
अभिनेत्री माधुरी दीक्षितनं केलं मतदान
अभिनेत्री माधुरी दीक्षितनं मुंबईत जुहू इथं मतदान केलं.
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची कार फोडली
केंद्रीय मंत्री आणि आसनसोलमधले भाजपाचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांची कार फोडण्यात आली आहे. इथं भाजपचा पोलिंग एजंट उपस्थित नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसच्या पोलिंग एजंटने केला आहे.
आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांची सुरक्षा रक्षकांशी झटापट
पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि सुरक्षादलातील रक्षकांची झटापट झाली.
नाशिकमध्ये पहिल्या 2 तासात 9 टक्के मतदान
नाशिकमध्ये पहिल्या 2 तासात 9 टक्के मतदान झालं आहे.
शरद पवार यांनी केले मतदान
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे जावई सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुद्धा उपस्थित होत्या.
मनोज कोटक यांचं मतदान
ईशान्य मुंबईत भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदान केले. मावळते खासदार किरिट सोमय्या यांच्याऐवजी भाजपाने यंदा कोटक यांना तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे संजय दिना पाटील निवडणूक लढवत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांचे मतदान
मुंबईत कुर्ला नेहरूनगर येथे 82 वर्षांचे सरदास आणि 80 वर्षांच्या मुक्ताबाई यांनी मतदान केलं.
जम्मू आणि काश्मीरमध्येही आज मतदान
मुंबई माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केले मतदान
खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं मतदान
मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड थेरगावमध्ये मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातूनच ते शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे.