संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. नरेंद्र मोदींमुळे रशियानं 6 तास युद्ध थांबवलं या महाराष्ट्र भाजपच्या दाव्यात किती तथ्य?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    खारकिव्ह शहरातील भारतीयांना बाहेर काढण्यासंदर्भात काही बनावट बातम्या आणि राजकीय वक्तव्यं समोर आली आहेत.

    भारतीय विद्यार्थ्यांना खारकीव्हमधून बाहेर पडता यावं, यासाठी रशियाने त्या भागात सहा ते आठ तासांसाठी युद्ध थांबवलं होतं, असा दावा करणाऱ्या अनेक बनावट बातम्या आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट गेल्या आठवड्यात सर्वत्र पसरले होते.

    या खोट्या बातम्या किमान आठ प्रमुख राष्ट्रीय वृत्तमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं. यापैकी कोणत्याही माध्यमाने आपल्या वार्तांकनात दुरुस्ती अथवा खुलासा केलेला नाही. अशा खोट्या बातम्या अजूनही त्या माध्यमांच्या संकेतस्थळांवर आणि फेसबुक, ट्विटर व यु-ट्यूब इत्यादी समाजमाध्यम मंचांवर उपलब्ध आहेत. यातील काही मंचांचे तर एक कोटींहून अधिक फॉलोअर आहेत.

    अशाच एक खोटा दावा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केला होता. किमान सहा प्रमुख भाजप नेत्यांनी स्वतःच्या 'व्हेरिफाइड' ट्विटर खात्यांवरून हाच दावा शेअर केला. या नेतेमंडळींचे लाखो फॉलोअर आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- हा महाराष्ट्र भाजपचा दावा किती खरा?

  2. युक्रेनमध्ये 'Z' अक्षराची दहशत

  3. 12 लाख लोक युक्रेनमधून पोलंडमध्ये

    poland ukraine

    युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून पोलंडमध्ये 12 लाख लोकांनी आसरा घेतल्याचं पोलिश गार्ड एजन्सीने म्हटलंय.

    poland
    • सोमवारी 7 मार्चच्या एका दिवसात 1,41,500 लोकांनी सीमा ओलांडल्याचं पोलिश बॉर्डर गार्ड एजन्सीने ट्विटरवर लिहिलंय. रविवारी 6 मार्चला 1,42,300 जणांनी युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केला होता.
    • युक्रेनमधून येणाऱ्या लोकांपैकी 90% युक्रेनियन नागरिक आहेत. यात बहुतेक महिला आणि मुलं आहे. यापैकी 40% जण पोलंडमधून इतर देशांमध्ये गेल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.
    • पोलंडमध्ये आधीपासूनच साधारण 10 ते 20 लाख युक्रेनियन नागरिक आहेत. आणि म्हणून युक्रेनसोडून अनेकजण आता त्यांच्या कुटुंबियांकडे किंवा मित्रमंडळींकडे रहायला आले आहेत.
    • अनेक पोलिश नागरिकांनी आपल्या घरांमध्ये युक्रेनच्या निर्वासितांना आसरा दिलाय. आणि असं करणाऱ्या पोलिश नागरिकांना आर्थिक मदत देण्यात यावी का, यावर पोलंडच्या संसदेत चर्चाही होणार आहे.
    • यासोबतच युक्रेनियन नागरिकांना पोलंडमध्ये 18 महिने राहण्याचे आणि काम करण्याचे अधिकार आणि मोफत आरोग्यसेवा आणि शालेय शिक्षण द्यायचं का यावरही चर्चा होणार आहे.
  4. आतापर्यंत काय घडलं?

    पोलंड सीमा

    नमस्कार,युक्रेन-रशिया युद्धाला सुरुवात झाल्यापासून आपण बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर या युद्धाच्या सर्व घडामोडी जाणून घेत आहोत. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. बीबीसी मराठीचे पराग फाटक आणि ओंकार करंबेळकर आजच्या घडामोडी या लाइव्ह पेजच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहेत.

    कालपर्यंत काय घडलं?

    • क्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार भारतीयांना परत आणल्याचा दावा भारत सरकारने केलाय. युक्रेनच्या सुमे शहरात अडकलेल्या सगळ्यात भारतीयांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
    • युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे. निर्वासिताचं हे प्रमाण आणि समस्या दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घटना असल्याचं युनायटेड नेशन्सचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्राँडी यांनी म्हटलं होतं.
    • रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 1,207 नागरिक ठार झाल्याचं वा जखमी झाल्याचं युनायटेड नेशन्सने त्यांच्या आकडेवारीत म्हटलंय. युक्रेनमध्ये आतापर्यंत 406 लोक मारले गेले आहेत. तर 801 नागरिक जखमी झाले आहेत. पण हा आकडा "अधिक मोठा असण्याची शक्यता असल्याचं" युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार उच्चायुक्त लिझ थ्रोसेल यांनी म्हटलंय.
    • पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.
    • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं चित्र 'द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे. झेलेन्स्की युक्रेनचा झेंडा हातात घेऊन, युद्धभूमीवर ठामपणे उभे असल्याचे या चित्रातून दाखवण्यात आलं आहे. झेलेन्स्कींनी लष्कराचे कपडे परिधान केल्याचे या चित्रात दाखवण्यात आलंय.
    • जागतिक बँकेनं युक्रेनसाठी 700 मिलियन डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिलीय.
    • इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) चे अधिकारी चेर्नोबिलला भेट देण्याची शक्यता आहे.
    • ऑस्ट्रेलियातील ऊर्जा कंपनीनं रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतलाय.
    • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्चं तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केलं आहे.

    कालच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- युक्रेनमधील लोकांची देशाबाहेर पडण्यासाठी धडपड

  5. मारिओपोलमधल्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर हवाई हल्ला, हवाई क्षेत्र बंद करण्याची झेलेन्स्कींची पुन्हा मागणी

  6. ओलेना झेलेन्स्का : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कीच्या पत्नी कोण आहेत?

  7. रशियाची गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी, कच्च तेल 300 डॉलरवर जाण्याची भीती

  8. नरेंद्र मोदींमुळे रशियाने 6 तास युद्ध थांबवलं, हा महाराष्ट्र भाजपचा दावा किती खरा?

  9. चीन आणि रशियामध्ये किती व्यापार होतो?

  10. युरोपचा गॅस पुरवठा रोखण्याची रशियाची धमकी

    पुतिन

    पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय.

    रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.

    युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला शिक्षा करण्याचा मार्ग म्हणून अमेरिका सहकारी राष्ट्रांसह संभाव्य बंदी शोधत आहे. मात्र जर्मनी आणि नेदरलँड्सने अमेरिकेची ही योजना नाकारली.

    युरोपियन कमिशनला 40 टक्के गॅस आणि 30 टक्के तेल रशियातून येतो. जर यात अडथळा आल्यास, त्याला कुठलाच पर्याय नाहीय.

  11. युक्रेनमधून लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियाची पुन्हा तयारी

    सोमवारी संघर्षविरामाच्या घोषणेनंतरही रशियाकडून हल्ले होत राहिल्यानं भारतीय विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर निघण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागलं.

    भारतातील रशियाच्या दूतावासानं यावर आज बाजू मांडत म्हटलं की, 8 मार्चला स्थानिक वेळेनुसार 10 वाजल्यापासून संघर्षविरामाची घोषणा केली आहे. सुमीहून पोल्ताव्हा आणि बेल्गोरोड जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

    त्यानंतर विमान, रेल्वे आणि रस्तेमार्गे सर्वसामान्य लोकांना आपापल्या ठिकाणी पोहोचण्यासाठीही नियोजन करण्यात आलं होतं.

    रशियानं ही माहिती संबंधित देश, संयुक्त राष्ट्र आणि दूतावासांपर्यंत पोहोचवली होती.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    हे युक्रेननंही करणं अपेक्षित होतं. मात्र, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यास युक्रेन अयशस्वी ठरला आणि त्यामुळे कीव्ह, सुमी, चेर्निगव्ह, खारकीव्ह आणि मारियुपोलसह संपूर्ण युक्रेनमध्ये स्थिती बिघडत चालली आहे. अमानवीय संकटात रुपांतर होतंय.

    रशियाने म्हटलंय की, आम्ही पुन्हा एकदा लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रस्ते तयार करत आहोत. मात्र, युक्रेनच्या पुढाकारावरही हे यशस्वी होणं बेतलेलं आहे

  12. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  13. युक्रेन मागणी करत असलेला 'नो फ्लाय झोन' म्हणजे नेमकं काय?

  14. महिला दिन....

    महिला दिन, रशिया, युक्रेन
    फोटो कॅप्शन, युक्रेनमधील झोपोरिजझियामधलं छायाचित्र. आई आणि तिची दोन लेकरं युक्रेनबाहेर सुरक्षितरित्या बाहेर जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत आहेत. आईच्या चेहऱ्यावरची भीती आणि डोळ्यातील अश्रू कुणाही संवेदनशील माणसाचं काळीज कापणारं आहे. दोन्ही लेकरांना कवेत घेऊन आधार देऊ पाहतेय ही माय....
  15. 'मी माझ्या बिबट्या-जग्वारबरोबरच येईन नाही तर नाही', युद्धात अडकलेल्या गिरीकुमार पाटलांचा निर्धार

  16. VIDEO : युक्रेनबाहेर पडेपर्यंत मराठी मुलांची उपासमार

    युक्रेनमध्ये अडकलेले मराठी मुलं आता मायदेशी परतत आहेत. पण युक्रेनमधून बाहेर पडण्याआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेवण, पाणी वेळेवर मिळालं नाही. रस्त्यावर बर्फवृष्टी होत असताना दिवसरात्र प्रवास करावा लागला.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  17. 'युक्रेनमधून 20 हजार भारतीयांना सुरक्षित बाहेर काढलं'

    भारत
    फोटो कॅप्शन, टीएस तिरुमूर्ती

    संयुक्त राष्ट्रातील भाराताचे राजदूत टीएस तिरुमूर्तींनी सुरक्षा परिषदेत सांगितलं की, भारतानं युक्रेनमधून आतापर्यंत 20 हजार भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळवलंय.

    याचसोबत, भारतानं युद्धग्रस्त देशातून निर्दोष लोकांना आणि भारतीय नागरिकांना सुरक्षित रस्ता देण्याची मागणीही केलीय.

    "भारतानं रशिया आणि युक्रेनला सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडोअर बनवण्यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, तरीही अद्याप कॉरिडोअर बनवण्यात आलं नाही. त्यामुळे काळजी वाटते," असंही तिरुमूर्ती म्हणाले.

    रशिया युक्रेन

    मानवीय कारवाई तटस्थता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य या सिद्धांतांच्या दिशेनं असायला हवी, असंही ते म्हणाले.

    "आम्ही त्या देशांच्या नागरिकांचीही मदत केली, ज्यांनी आमच्याकडे मदत मागितली. येत्या दिवसात लोकांना बाहेर काढणं आम्ही सुरूच ठेवू. 80 हून अधिक विमानं लोकांना घरात पोहोचवण्यासाठी युक्रेननजिकच्या देशांमधून आतापर्यंत उडाली आहेत," असं तिरुमूर्तींनी सांगितलं.

  18. पुतिन यांच्या आक्रमकतेचा बिमोड करण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वाची ठरु शकते, कारण...

  19. मी कुणालाही घाबरत नाही, युद्ध जिंकेपर्यंत इथेच राहीन - झेलेन्स्की

    झेलेन्स्की

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी सोशल मीडियावर नवीन व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत ते कीव्हमधील त्यांच्या कार्यालयात बसलेले दिसतायेत.

    झेलेन्स्की व्हीडिओत म्हणाले आहेत की, "लपत नाहीय. आणि मी कुणालाही घाबरत नाहीय. जोपर्यंत युद्ध जिंकत नाही, तोपर्यंत मी इथेच राहणार आहे."

    झेलेन्स्कींनी या व्हीडिओत ऑफिसमधून कीव्हचे दृश्यंही दाखवले. सोमवारी सकाळी हा व्हीडिओ बनवल्याचे आणि कीव्हमधूनच व्हीडिओ बनवल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आजूबाजूचे दृश्यंही दाखवले.

  20. आज युद्धाचा 13 वा दिवस

    पेट्रोल

    नमस्कार,

    बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण गेले 12 दिवस रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्या पाहात आहोत.

    आज या युद्धाचा 13 वा दिवस आहे. या युद्धासंदर्भात जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी नामदेव काटकर आणि ओंकार करंबेळकर येथे देत आहेत.

    आतापर्यंत काय काय घडलं?

    • 2008 नंतर तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक बाजारात इराणचं तेल उपलब्ध व्हायला झालेला उशीर आणि अमेरिका तसंच युरोपियन युनियनकडून रशियाकडून मिळणाऱ्या तेलावर बंदीमुळे खनिज तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.
    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. आज मोदी यांनी पुतिन यांच्याशी 50 मिनिटे संवाद साधला. याआधी मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी देखील चर्चा केली होती.
    • युक्रेनमधील सुमीममध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सहकार्यकरा, अशीमागणी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चाझाली.
    • युक्रेनमधील युद्धग्रस्त भागात असलेल्या लोकांनाबाहेर जाता यावे यासाठी रशियाने मानवी कॉरिडोर उघडण्याचा प्रस्ताव युक्रेनला दिला आहे.
    • युक्रेनच्या चीफ ऑफ जनरल स्टाफ यांनी सांगितलं की कीव्ह शहरासाठीच्या सुरक्षायंत्रणांनी चुहुइव शहर ताब्यात घेतलं.
    • युक्रेनमध्ये वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या सर्वसामान्य लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया हल्ला रोखेल, अशी माहिती रशियाच्या सरकारी माध्यमाने दिलीय.
    • कीव्ह, खारकीव्ह यांसारख्या शहरांमध्येही हल्ले रोखण्यासाठी तयार आहोत, असं रशियानं म्हटलंय.

    काल घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा-झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा