संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
रशिया-युक्रेन युद्ध कसं संपू शकतं? 'या' 5 शक्यता जाणून घ्या
उद्ध्वस्त घरं, राख, मातीचा ढीग; युक्रेनचं विदारक चित्र दाखवणारे 7 फोटो
युक्रेन रशिया वादामुळे भारतात इंधन दराचा भडका उडणार?
फक्त बायका-पोरंच ट्रेनमध्ये चढू शकतात: युक्रेनच्या या स्थानकावर कुटुंबांची ताटातूट
रशियाच्या हवाई हल्ल्यात हे शहर असं पडलं
भारताच्या भूमिकेमुळे युक्रेनमध्ये विद्यार्थी संकटात सापडले का?| सोपी गोष्ट 548
युक्रेन युद्धात रशियाचं किती लष्करी नुकसान झालंय?
जगात फक्त 'या' व्यक्तींकडे आहेत अणूबॉम्ब टाकण्याचे अधिकार
रशियाने ताब्यात घेतलेलं चेर्नोबिल पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा
युक्रेनमध्ये कार्यरत असलेली बीबीसीची टीम

फोटो स्रोत, @lyse.doucet
युक्रेनमधली कॅमेऱ्यामागची ही बीबीसी न्यूजची टीम आहे. तुमच्यासाठी रशिया-युक्रेन संघार्षाचे क्षणोक्षणीचे अपडेट पाठवत आहेत.
ब्रेकिंग, रशियाचा झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा – युक्रेन
रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.
युक्रेनस्थित झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्यानं आगीची घटना घडली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात युक्रेनच्या अग्निशमन दलाला यश आलं.
मात्र, आता या अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाच्या सैन्यानं ताबा मिळवल्याची माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिली.
या प्रकल्पातील पॉवर यूनिट्सच्या स्थितीवर संबंधित अधिकारी लक्ष ठेवून असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. रॉयटर्स वृत्तसेवा संस्थेनं ही माहिती दिली.
युक्रेन युद्धात रशियाचं किती मोठं लष्करी नुकसान झालंय?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
रोमानियाच्या सीमेवर ज्योदिरात्य शिंदे विद्यार्थ्यांचं स्वागत करताना...
भारत सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊन, तिथून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्याचं नियोजन करत आहेत.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियात आहेत. त्यांनी काल (3 मार्च) 219 जणांना रोमानियाच्या सीमेवरील सुसिव्हा इथून भारतात पाठवण्याची सोय केली. या नागरिकांना बुखारेस्टपर्यंत आणण्याऐवजी कमी अंतरावरील सुसिव्हा इथूनच मायदेशी पाठवण्यात आलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या विमानातली बरेचसे नागरिक ओडिसामधील होते. ज्योतिरादित्य शिंदेंनी यातील काही विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
एअरबीएनबीने रशिया आणि बेलारुसमधील सर्व काम थांबवले
बेलारुस आणि रशियामध्ये आपण कामकाज थांबवत आहोत असं अमेरिकन कंपनी एअरबीएनबीने जाहीर केलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याची माहिती या कंपनीच्या प्रमुखांनी ट्वीट करुन दिली आहे. एअरबीएनबीसारख्या अनेक कंपन्यांनी असा निर्णय घेतला आहे. युरोपातील अनेक देश, अमेरिका यांनी रशियावर अनेक आर्थिक, वाहतूक निर्बंध लादले आहेत.
भर युद्धाच्या काळात युक्रेनच्या नव्या नागरिकांचा जन्म
युक्रेनच्या समुद्रकिनारी स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडालं
युक्रेनच्या समुद्रकिनारी एका स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडलीय.
एस्टोनियास्थित व्हिस्टा शिपिंग एजन्सी या जहाजाची मालक आहे. एस्टोनिया बाल्टिक देश असून, नेटाचा सदस्य सुद्धा आहे. या देशाची सीमा रशियाला लागून आहे.
किनाऱ्यावर स्फोट झाल्यानंतर जहाज समुद्रात बुडालं. मात्र, हा स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीय.
या जहाजावरील चालक पथकातील दोन सदस्य आणि इतर चार जणांना युक्रेनस्थित बचाव पथकानं वाचवलं.

फोटो स्रोत, Henk Jungerius
रशियाने खारकीव्हच्या या भागात क्लस्टर बाँब टाकला असं सांगण्यात येत आहे.

रशियाने युक्रेनमध्ये क्लस्टर बाँबचा वापर केला, असा आरोप केला जात आहे.

अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश – आपत्कालीन सेवा
युक्रेनमधील आपत्कालीन सेवेनं अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश मिळवलंय.
झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश आलं असून, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती युक्रेनकडून देण्यात आलीय.
