संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. टीव्ही चॅनेलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला कीव्हवरील हल्ला

    CBS News च्या कॅमेऱ्यात कीव्हवर झालेला हल्ला कैद झाला आहे. वार्ताहराच्या मागेच मोठा स्फोट झाला आणि मग पुढे काय झालं?

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं?

    युक्रेनी नागरिक

    रशिया-युक्रेन संघर्षाचे सर्व अपडेट्स तुम्हाला लाइव्ह पेजवर वाचू शकता. जर तुम्ही आताच हे लाइव्ह पेज पाहात असला, तर आजच्या दिवसभरात काय काय घडलं हे थोडक्यात जाणून घ्या-

    • युक्रेनचे लोक सध्या टाइम मासिकाचं मुखपृष्ठ एकमेकांत शेअर करत आहेत. कारण या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कीयांना स्थान दिले आहे.
    • शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी (1 मार्च) त्यांनी खारकीव्ह सोडलं.
    • खारकीव्ह आणि सुमीमधील हल्ले थांबले तर परदेशी विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट केले आहे.भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांनी रशियाकडे याची मागणी करावी असं युक्रेन सरकारने म्हटले आहे.
    • रशियाच्या युक्रेन आक्रमणाचा आजचा आठवा दिवस आहे. रशिया आपल्या रहिवासी भागांवर हल्ले करत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.राजधानी कीव्हबरोबर खारकीव्हवरही मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.
  3. भारतीय विद्यार्थ्यांबद्दल रशियाने केलेल्या दाव्यावर जर्मनीच्या राजदूतांचा संताप

    मायदेशी परतलेला विद्यार्थी

    युक्रेनमध्ये मानवी ढाल म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना बंधक बनवलं गेलं हा रशियाचा दावा म्हणजे खोटा प्रचार असल्याचं भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी म्हटलं.

    एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, सरकारी प्रोपागंडा एवढ्या खालच्य पातळीवर पोहोचला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    रशियन दूतावासानं संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दावा केला की, युक्रेन विद्यार्थ्यांना सशस्त्र ‘मानवी ढाली’प्रमाणे वापरत आहेआणि त्यांना रशियन भागांपर्यंत पोहोचण्यापासून अडवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.

    अर्थात, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. युक्रेनमध्ये कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला बंधक बनवलं गेल्याचं कोणतंही वृत्त नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

    यावर भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी लिहिलं आहे की, जे क्रूर आक्रमणकारी युक्रेनमध्ये लाखो लोकांच्या वेदनेला कारणीभूत आहेत, ते पीडितांनाच दोष देत आहेत. युक्रेनमध्ये नागरिकांवर (भारतीय विद्यार्थ्यांवरही) बॉम्ब हल्ले होत आहेत. हे सगळं अविश्वसनीय आहे.

  4. एकिकडे रशियाचे हल्ले होत आहेत तर दुसरीकडे युक्रेनचे नवे नागरिक जन्मास येत आहेत

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  5. MBBS प्रवेशासाठी कोट्यवधी रुपयांच्या डोनेशनमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनला जातात?

    indian students

    युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

    रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर शेकडो विद्यार्थी युक्रनेच्या विविध राज्यांमध्ये संकटात आले.

    एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जातात हे समोर आल्यानंतर यानिमित्तानं अनेक मुद्यांवर सध्या चर्चा सुरू आहे.

    भारतात एमबीबीएस शिक्षणासाठी खरंच कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो का?

    महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयांची फी किती आहे? आणि शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  6. ब्रेकिंग, शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंडला पोहोचले

    शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी (1 मार्च) त्यांनी खारकीव्ह सोडलं.

    खारकीव्ह ते लिव्हिव्ह असा 18 तासांचा प्रवास त्यांनी रेल्वेने केला. लिव्हिव्ह ते युक्रेन-पोलंड बॉर्डर ते बसने गेले. त्यासाठी त्यांना 14 तासांचा प्रवास करावा लागला.

    आता ते पोलंड सीमेवर सरकारी निवारागृहात राहत आहेत.

    "आम्ही कसेबसे आता पोलंडला पोहचलो आहोत. थंडी खूप आहे. जवळपास 400 विद्यार्थी अजून खारकीव्हलाच अडकले आहेत. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून चालत येत आहेत." अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.

  7. युक्रेन-रशिया संघर्षामध्ये आता पुढे काय होणार?

    युक्रेन सध्या रशियाच्या आक्रमणाचा सामना करत आहे. सोबतच युक्रेनची स्वत:च्या अस्तित्वासाठीची लढाईसुद्धा सुरू आहे.

    युक्रेनवर रशियानं हल्ला करून आता दोन-तीन दिवस उलटले आहेत. रशियाचं सैन्य आता राजधानी कीव्हपर्यंत पोहोचलं आहे. पण, आता पुढे काय होणार हा मोठा प्रश्न आहे.

    युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सध्याही संघर्ष सुरू आहे.

    युक्रेनवर कब्जा करण्याच्या डिफेन्स चीफ यांच्या योजनेचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेक महिने अभ्यास केला.

    kieve

    या योजनेनुसार, युक्रेनवर उत्तर, पूर्व आणि दक्षिण अशा तिन्ही बाजूंनी हल्ला केला जातो. बाँब तसंच मिसाईल हल्ला करून विरोधाचा जोर कमी केला जातो. त्यानंतर पायदळ आणि टँक युद्धभूमीवर उतरवले जातात.

    युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारनं लवकरात लवकर आत्मसमर्पण करावं आणि तिथं रशियाच्या बाजूचं सरकार स्थापन करावं, असं पुतिन यांना वाटतं. देशातील राष्ट्रीय विरोधाच्या दीर्घकालीन मोहिमेला गती देण्यापासून रोखणं, हाही यामागचा उद्देश आहे.

    इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजचे ब्रिगेडियर बेन बैरी यांच्या मते, रशियानं कीव्हवर यशस्वीपणे कब्जा मिळवला तर ते रशियासाठी लष्करी आणि राजकीय यश असेल.

    पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- युक्रेन-रशिया संघर्षामध्ये आता पुढे काय होणार?

  8. विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ‘हे’ पाऊल उचला- युक्रेनचा भारताला सल्ला

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    खारकीव्ह आणि सुमीमधील हल्ले थांबले तर परदेशी विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट केले आहे.

    भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांनी रशियाकडे याची मागणी करावी असं युक्रेन सरकारने म्हटले आहे.

    युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालय आपल्या ट्वीटमध्ये म्हणतं, आम्ही भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांच्या सरकारांना आवाहन करतो की आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रशियाकडून मानवी कॉरिडॉरची मागणी करावी, रशियाच्या हल्ल्यामुळे हे विद्यार्थी खारकिव्ह आणि सुमीमध्ये अडकले आहेत.

  9. जेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी युक्रेनहून परत आलेल्या विद्यार्थ्यांचं 4 भाषांमध्ये स्वागत केलं...

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. खारकीव्ह शहराजवळ हल्ला, 2 लहान मुलांसह 8 मृत्युमुखी

    Unian

    रशियाच्या युक्रेन आक्रमणाचा आजचा आठवा दिवस आहे. रशिया आपल्या रहिवासी भागांवर हल्ले करत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

    राजधानी कीव्हबरोबर खारकीव्हवरही मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.

    खारकीव्हपासून एक-दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या इजियम शहरात 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

    रशियाच्या हल्ल्यात सिटी सेंटरचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी एका सरकारी इमारतीला या हल्ल्याचा तडाखा बसल्याचं आणि अनेक पोलीस जखमी झाल्याचं या शहराचे उपमहापौर वोलोदिमीर मात्सोकिन यांनी सांगितले.

  11. पुतीन यांच्या रशियावर कोणकोणते निर्बंध लादण्यात आले आहेत?

  12. ब्रेकिंग, 100 भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण- बेलारुसचा दावा

    भारतीय विद्यार्थी
    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

    पोलंड सीमेवर सुरक्षारक्षकांनी 100 भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करुन पुन्हा युक्रेनमध्ये पाठवले असा दावा बेलारुसने केला आहे.

    या मुलांना रुमानियातील एका आश्रयछावणीत जागा देण्यात आली होती असा दावा करण्यात आला आहे.

    संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना बेलारुसचे राजदूत व्हॅलेन्टाइन रयबाकोव्ह यांनी वरील माहिती दिली.

    रयबाकोव्ह म्हणाले, “पोलंडच्या सीमेवर सुरक्षारक्षकांनी 26 फेब्रुवारीला जवळपास 100 भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि परत युक्रेनला पाठवलं. त्या मुलांना रुमानियामध्ये आश्रयछावणीत ठेवण्यात आलं आहे.”

    रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू आणि चीनचा एक नागरिक जखमी झाल्याचं युक्रेनचे संयुक्त राष्ट्रामधील राजदूत सर्गेई किस्लिट्स्या यांनी सांगितलं.

  13. सरकारनं युक्रेनमधून भारतीयांना आणायला उशीर केलाय का?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  14. व्लादिमीर पुतिन 'न्युक्लिअर बटन' दाबतील का?

    2005 साली पुतिन यांचा क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचं निरीक्षण करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. आता जर युक्रेन संघर्षाची परिणती आपल्या मनाप्रमाणे होत नाहीये, हे लक्षात आलं तर पुतिन उतावीळपणे पुढचं पाऊल उचलू शकतात.

    2018 साली प्रदर्शित झालेल्या एका माहितीपटात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं होतं, "जर कोणी रशियाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. ही गोष्ट मानवतेला आणि जगासाठीही विनाशकारक असेल, हे निश्चित. पण मी रशियाचा नागरिक आणि देशाचा प्रमुख आहे. रशिया नसेल तर जगाचीही गरज काय?"

    आता आपण 2022 मध्ये येऊया. पुतिन यांनी युक्रेनविरोधात पूर्ण क्षमतेनं युद्ध पुकारलं आहे, पण युक्रेनच्या लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. क्रेमलिनला धक्का देणारी अजून एक गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशही रशियावर आर्थिक आणि वित्तीय निर्बंध लादण्यासाठी एकत्र आले. पुतिन यांच्या अधिपत्याखालील व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची वेळ आली.

    पूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-व्लादिमीर पुतिन 'न्युक्लिअर बटन' दाबतील का?

  15. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडता येईल?

    युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडता येईल?

    भारतीय वायू दलाच्या सी-17 विमानांमधून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे चार केंद्रीय मंत्र्यांना वेगवेगळ्या देशात पाठवून हे विद्यार्थी भारतात यावेत यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

    मात्र अजूनही युक्रेनमधील विविध शहरांत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना तातडीची मदत गरज मिळणं गरजेचं आहे.

    त्यामुळे युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये केंद्रीय मंत्र्यांना पाठवून हे काम खरंच सोपं होईल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    भारत सरकारने आपल्या नागरिकांची युद्धभूमीतून यापूर्वीही सुटका करण्याच्या मोहिमा पूर्ण केल्या आहेत. 1990 साली कुवैतमधून, 2003 साली इराक, 2015मध्ये येमेनमधून अशी सुटका करण्यात आली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    1990 साली तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी सुटकेची मोहीम राबवून कुवेतमधील 1.70 लाखांहून अधिक भारतीयांची सुटका केली होती.

    ही जगातली सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम होती.

    2015मध्ये येमेनमध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  16. आक्रमण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल- वोलोदिमीर झेलेन्स्की

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला युक्रेनियन लोक चोख प्रत्युत्तर देतील असं आपल्या भाषणात म्हटलं आहे. आक्रमण करणाऱ्यांना आपलं प्रत्युत्तर कायम लक्षात राहिल असंही म्हटलंय.

  17. ऑपरेशन गंगाद्वारे भारतीयांना सोडवण्याच प्रयत्न

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    ऑपरेशन गंगाद्वारे युक्रेनमधून त्याच्या शेजारील देशात पोहोचलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलंडमधून 437 भारतीय आणि एका बांगलादेशी व्यक्तीस भारतात पाठवले गेले. यावेळेस केंद्रीय मंत्री मेजर जनरल निवृत्त व्ही. के. सिंह उपस्थित होते.

  18. ब्रेकिंग, स्विफ्ट बँकिंगमधून रशियाच्या 7 बँकांना वगळलं

    स्विफ्ट बँकिंगमधून रशियाच्या 7 बँकांना वगळलं

    रशियाच्या 7 बँकांना आपल्या जागतिक नेटवर्कमधून वगळल्याचं स्विफ्ट बँकिंग प्रणालीनं स्पष्ट केलं आहे. ही कारवाई 12 मार्च रोजी पूर्ण होईल.

    रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिका, युरोपिय महासंघ, ब्रिटन आणि त्यांच्या अनेक सहकारी देशांनी रशियाच्या बँकांना स्विफ्टमधून बाहेर काढम्याचा निर्णय घेतला होता.

    जगभरात हजारो वित्तसंस्था स्विफ्ट प्रमालीचा वापर करतात. रशियाही तेल आणि वायू निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर या प्रणालीचा वापर करतो.

    युक्रेनन आक्रमणानंतर रशियावर घातलेला हा मोठा निर्बंध मानला जात आहे. रशियापूर्वी एकदा इराणला या प्रणालीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

  19. रशिया युक्रेन युद्धात अडकण्याला जबाबदार कोण?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  20. मराठी-युक्रेनी कुटुंब युद्‌धभूमीतून कसं बाहेर पडलं?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    "मी माझ्या दोन्ही मुलांसोबत बाहेर खेळत होतो. तेवढ्यात मोठा स्फोट झाला," मूळचे वसईचे असलेले टोनी कर्वालो युक्रेनमधल्या युद्धाचा आपला अनुभव सांगतात.

    आपली युक्रेनी पत्नी ओलेना आणि दोन मुलांसह टोनी ओदेसा शहरात राहात होते. पण रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यावर त्यांना घर सोडावं लागलं.

    मजल दरमजल करत हे कुटुंब रोमानियापर्यंत कसं पोहोचलं? त्यांना वाटेत काय दिसलं? टोनी आणि ओलेनानं आपले अनुभव बीबीसी मराठीला कथन केले आहेत.

    वसईतले टोनी युक्रेनला कसे पोहोचले?

    41 वर्षांचे टोनी पेशानं आयटी मॅनेजर आणि एक खलाशी आहेत. ते रॉयल कॅरिबियन कंपनीच्या जहाजांवर काम करतात.

    जहाजावरच त्यांची ओळख युक्रेनच्या ओलेना इव्हानविना स्टेफाक यांच्याशी झाली. दोघांनी 2014 साली लग्न केलं. टोनी आणि ओलेना यांना दोन मुलंही आहेत.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- मराठी-युक्रेनी कुटुंब युद्‌धभूमीतून कसं बाहेर पडलं?