संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. ब्रेकिंग, वाहन मिळालं नाही तर पायी निघा, खारकीव्हमधल्या भारतीयांसाठी नवीन ॲडव्हायजरी

    युक्रेनमधल्या खारकीव्ह शहरात असणाऱ्या भारतीयांसाठी एक नवीन ॲडव्हायजरी जाहीर करण्यात आली आहे. वाहन मिळालं नाही तर पायी शहरातून बाहेर पडा, असं सांगण्यात आलंय.

    युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने म्हटलंय. "बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेत लोकांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ, पुन्हा सांगतो तात्काळ खारकीव्ह सोडावं. त्यांनी पेसोचिन, बाबाई आणि बेझ्लेयुदिव्काकडे शक्य तितक्या लवकर जावं.

    "ज्या विद्यार्थ्यांना वाहनं किंवा बस किंवा रेल्वे मिळत नसेल त्यांनी पायी पेसोचिन (11 किमी), बाबाई (12 किमी) आणि बेझ्लेयुदिव्का (16 किमी) जावं.

    "लगेच निघा. कोणत्याही परिस्थितीत भारतीयांनी या ठिकाणी आज युक्रेनी वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. वोलोदिमीर झेलेन्स्की : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी राजकारणासाठी कॉमेडी करणं सोडलं

  3. रशियाने खेरसन ताब्यात घेतल्यास युक्रेनच्या पुरवठा साखळीवर येईल ताण

    युक्रेनच्या रस्त्यावरचा रशियन लष्कराचा ट्रक
    फोटो कॅप्शन, युक्रेनच्या रस्त्यावरचा रशियन लष्कराचा ट्रक

    युक्रेनमध्ये शिरत असतानाचे रशियाच्या एका लष्करी वाहनाचे अज्ञात ठिकाणाचे फोटो समोर आले आहेत.

    रशियाच्या सैनिकांनी काळ्या समुद्रातील बंदरावरील खेरसन शहरावर ताबा मिळवला असल्याचा दावा रशियानं केला आहे. विभागीय गव्हर्नर आणि शहराचे महापौर यांनी आजुबाजूला लष्कराचा घेराव असल्याचं म्हटलं आहे. मात्र खेरसनवर रशियानं ताबा मिळवल्याचं वृत्त त्यांनी नाकारलं आहे.

    शहरावर ताबा मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचं रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटचे लष्करी तज्ज्ञ डॉ. जॅक वॉल्टिंग यांनी म्हटलं. त्याचं कारण म्हणजे युक्रेनची विभागणी करणाऱ्या नीपर नदीवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी हे शहर आहे.

    "रशियाच्या लष्करानं नीपर नदीवरील महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवायला रशियानं सुरुवात केली आहे. त्यामुळं त्यांना दॉनबसच्या आसपासच्या परिसरात लढत असलेल्या युक्रेनच्या सैन्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे होणारा रसद पुरवठा रोखण्यात यश मिळणार आहे," असं वॉल्टींग म्हणाले.

    रशिया लवकरच युक्रेनला मिळणारी रसद - पुरवठा बंद करेल असंही ते म्हणाले.

  4. युक्रेनबाबत अंदाज बांधण्यात व्लादिमीर पुतिन यांची चूक झाली का?

  5. ब्रेकिंग, तातडीने खारकीव्ह सोडा, भारतीय दूतावासाची भारतीय नागरिकांना सूचना

    युक्रेनच्या खारकीव्ह शहरात असलेल्या भारतीय नागरिकांना तिथल्या भारतीय दूतावासाने तातडीने शहर सोडण्याची सूचना दिली आहे.

    या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलंय, "तुमच्या सुरक्षेसाठी तातडीने खारकीव्ह सोडा. लवकरात लवकर पेसोचिन, बाबाये आणि बेझ्लीयुडोव्का या शहरांना जा. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनियन वेळेनुसार आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या वसाहतींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

  6. उद्ध्वस्त खारकीव्ह, हल्ल्यांमुळे ठिकठिकाणी पडझड आणि आग

    युक्रेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर असणारं खारकीव्ह रशियन फौजांच्या माऱ्याला तोंड देतंय. खासकीव्हमध्ये युक्रेनचे मोठे उद्योग आहेत.

    खारकीव्हमधली पोलिसांची इमारत
    फोटो कॅप्शन, रशियाच्या हल्ल्यांनी खारकीव्ह शहरातील पोलिसांच्या इमारतीला लक्ष्य केलं.
    हल्ल्यानंतर गव्हर्नर ऑफिस, खारकीव्ह
    फोटो कॅप्शन, खारकीव्हच्या गव्हर्नरचं ऑफिस ज्या इमारतीत आहे त्या इमारतीवर क्षेपणास्त्रं डागण्यात आलं. या हल्ल्यानंतरची इमारतीची ही अवस्था
    खारकीव्ह
    फोटो कॅप्शन, सरकारी कार्यालयं असणाऱ्या इमारतीवर क्षेपणास्त्रं हल्ला झाल्यानंतरची जवळच्या रस्त्यावरची अवस्था
    खारकीव्ह
    फोटो कॅप्शन, रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे कराझिन खारकीव्ह नॅशनल युनिव्हर्सिटीमधल्या या अर्थशास्त्र विभागाच्या इमारतीला आग लागली.
  7. तिसरं महायुद्ध अण्वस्त्रांनी होईल - रशियाचे परराष्ट्र मंत्री

    रशिया कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला अण्वस्त्रं मिळू देणार नसल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ यांनी म्हटलंय. तिसरं महायुद्ध अण्वस्त्रांनी होईल आणि ते विनाशकारी असेल असंही त्यांनी म्हटलंय.

    रशिया युक्रेनसोबतच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार आहे, पण युक्रेन अमेरिकेच्या तालावर चालत असल्याचं लावरोफ यांनी म्हटलंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    युक्रेन अण्वस्त्रं मिळण्याचे प्रयत्न करत आल्याचं लावरोफ यांनी दिवसभरापूर्वीही म्हटलं होतं. हा एक धोका असून तो रोखणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

    लावरोफ म्हणाले होते, "युक्रेनकडे अजूनही सोव्हिएतची न्युक्लियर टेक्नॉलॉजी आहे. म्हणून रशियाला या आव्हानाला विचारपूर्वक उत्तर द्यावं लागेल."

    पूर्वी सोव्हिएत संघामध्ये असेलल्या देशांमध्ये पश्चिमेतल्या देशांनी लष्करी तळ उभारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला होता. युक्रेनने अण्वस्त्र मिळवण्चाया प्रयत्न केला तर तो रशिया रोखेल असं लावरोफ म्हणाले होते.

    तर आपण रशियातल्या अण्वस्त्रं दलांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. अमेरिकेसह इतर अनेक देशांनी याचा निषेध केला होता.

  8. आणि झेलेन्स्कींच्या भाषणानंतर अख्खं सभागृह उभं राहिलं...

    व्हीडिओ कॅप्शन, युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या या भाषणावर अख्खं सभागृह उभं राहिलं...
  9. ब्रेकिंग, संघर्षात आजवर 5840 रशियन सैनिकांना ठार केलं - युक्रेनचा दावा

    रशियन रणगाडे

    रशिया - युक्रेन संघर्षादरम्यान आजवर आपण रशियाच्या 5,860 सैनिकांना ठार केल्याचा दावा युक्रेनने केलाय. रशियन सैन्याने हल्ला केल्यापासून आजपर्यंतची ही आकडेवारी असल्याचं युक्रेनच्या लष्कराने म्हटलंय.

    बीबीसीने स्वतंत्रपणे या दाव्याची पडताळणी केलेली नाही. पण युक्रेनवरच्या या हल्ल्यामध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालं असल्याचं ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.

    रशियन सैन्याचं किती नुकसान झालं, याचा युक्रेनने दिलेला तपशील असा :

    5,840 सैनिक

    30 विमानं

    31 हेलिकॉप्टर

    211 रणगाडे

    862 चिलखती गाड्या

    85 आर्टिलरी सिस्टम्स

    9 अँटी एअरक्राफ्ट सिस्टिम्स

    60 इंधन टँक

    355 लष्करी वाहनं

    40 MLRS रॉकेट लाँचर्स (ताब्यात घेतली)

  10. रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिका स्वतःचं सैन्य का पाठवत नाहीये?

    अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचं वर्णन 'रशियाची आक्रमकता' असं केलं आहे आणि या हल्ल्याचा निषेधही केला आहे. त्याच वेळी राजनैतिक पातळीवरून या कृत्याचं उत्तर देण्याचा बायडन यांचा प्रयत्न आहे.

    रशियाकडून युक्रेनवर हल्ला होईल, असा इशारा अमेरिका गेले काही आठवडे देतो आहे. हा इशारा अखेरीस खरा ठरला. या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विपरित परिणाम होईल, अशीही चिंता व्यक्त होते आहे.

    जो बायडेन

    दरम्यान, अमेरिकी सैनिकांना या युद्धात सहभागी होण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलं जाणार नाही, असं बायडन यांनी स्पष्ट केलं. अमेरिकी नागरिकांना वाचवण्यासाठीसुद्धा युक्रेनमध्ये अमेरिकी सैन्य जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा- रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिका स्वतःचं सैन्य का पाठवत नाहीये?

  11. आज सकाळपासून काय काय घडलं?

    नमस्कार,

    बीबीसी मराठीच्या वाचकांचे दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत

    युक्रेन- रशिया युद्धाच्या सातव्या दिवशी आज सकाळपासून काय घडामोडी घडल्या, याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. युक्रेनमधील युद्धक्षेत्रावरुन बीबीसीचे वार्ताहर वार्तांकन करत आहेत. त्याचे सर्व अपडेट्स येथे वाचायला मिळतील. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी अमृता दुर्वे आणि ओंकार करंबेळकर हे अपडेट्स मराठीमध्ये देत आहेत.

    • रशियाच्या विमानांना आता अमेरिकेच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही असा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केला.
    • खारकीव्हमध्ये रशियाचे पॅराट्रूपर्स दाखल झाले आहेत. युक्रेनच्या लष्करानेच यासंदर्भात सांगितलं आहे.
    • रशिया आणि बेलारुसच्या स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये प्रवेशाची बंदी घातली आहे.
    • युक्रेनमधून निघालेल्या नागरिकांचं पोलंड आणि हंगेरी या देशांनी स्वागत केलं आहे.
    • रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी उत्तर कोरियाने अमेरिकेला जबाबदार धरलं आहे.
    • रशियावर कोणत्याही स्वरुपाचे प्रतिबंध लादण्यास मेक्सिकोने नकार दिला आहे.

    युक्रेन युद्धासंदर्भातील सर्व बातम्या, व्हीडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा- युक्रेन-रशिया संघर्ष

  12. खेरसन शहरावर कब्जा केल्याचा रशियाचा दावा

    रशिया, युक्रेन
    फोटो कॅप्शन, रशियाने खेरसन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.

    युक्रेनमधल्या खेरसन शहरावर कब्जा केल्याचा दावा रशियाने केला आहे. शहराच्या विविध भागात रशियाच्या फौजा दिसून आल्या. खेरसन रेल्वे स्टेशन तसंच बंदरावर रशियाच्या सैनिकांनी कब्जा केल्याचं शहराच्या महापौरांनी सांगितलं.

    युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा हा सातवा दिवस आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राजधानी कीव्ह शहर युक्रेनने आपल्याकडे राखलं आहे.

    रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेची फेरी बेलारुस इथे पार पडली. मात्र या बैठकीचं काहीच फलित निघालं नाही. रशियाने हल्ले रोखण्यासाठी ज्या अटी ठेवल्या त्या मान्य करायला युक्रेनचे राष्ट्राध्य व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी नकार दिला.

    यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. युक्रेनमधलं दुसरं मोठं शहर खारकीव्हमध्ये क्षेपणास्त्र दागण्यात आली आहेत.

  13. ब्रेकिंग, खारकीव्ह शहरात पोलिसांच्या इमारतीवर हल्ला

    युक्रेन, रशिया
    फोटो कॅप्शन, खारकीव्ह शहरात पोलिसांच्या इमारतीची झालेली अवस्था

    रशियाच्या हल्ल्यांनी खारकीव्ह शहरातील पोलिसांच्या इमारतीला लक्ष्य केलं. टेलिग्रामवर आलेल्या व्हीडिओत युक्रेन सरकारचा सल्लागार धुराच्या लोळांमध्ये पडझड झालेली इमारत दाखवताना दिसतो आहे.

    याच भागात असलेल्या कराझिन नॅशनल युनिव्हर्सिटीलाही लक्ष्य करण्यात आलं.अँटॉन गेराश्नेको हे युक्रेन सरकारचे सल्लागार आहेत.

    बीबीसीने स्वतंत्रपणे या व्हीडिओच्या सत्यासत्यतेची शहानिशा करू शकलेलं नाही.

  14. खारकीव्हमध्ये गोळीबारात 21जणांचा मृत्यू

    रशिया, युक्रेन
    फोटो कॅप्शन, रशियाने खारकीव्हला लक्ष्य केलं आहे.

    रशियाने लक्ष्य केलेल्या खारकीव्ह शहरात गोळीबारात 21जणांचा मृत्यू झाला आहे तर 112 जण जखमी झाले आहेत.

    रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युतर देण्यात आलं आहे आणि सातत्याने लक्ष्यस्थानी असूनही आम्ही रशियाच्या फौजांना चोख टक्कर दिली आहे असं खारकीव्ह प्रादेशिक प्रशासनाने सांगितलं.

  15. रशियावर प्रतिबंध घालण्यास मेक्सिकोचा नकार

    रशिया, युक्रेन
    फोटो कॅप्शन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

    युक्रेनविरुद्ध युद्ध केल्याप्रकरणी रशियावर कोणत्याही स्वरुपाचे प्रतिबंध लादण्यास मेक्सिकोने नकार दिला आहे. मेक्सिकोच राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर टीका केली. रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.

    "जगातल्या विविध देशांशी चांगले संबंध राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही रशियावर कोणत्याही स्वरुपाचे निर्बंध लादणार नाही", असं लोपेझ यांनी सांगितलं.

    लोपेझ यांनी याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. अमेरिका आणि मेक्सिको यांचे संबंध चांगले असतानाही त्यांनी टीका केली होती. रशियाशी मेक्सिकोचे संबंध दृढ स्वरुपाचे नाहीत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. भारतीय विद्यार्थ्यांच्या युक्रेनवारीची कारणं समजून घेऊया

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  17. रशिया-युक्रेन युद्धाला अमेरिका जबाबदार- उत्तर कोरिया

    युक्रेन, रशिया
    फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाने

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी उत्तर कोरियाने अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. वॉशिंग्टनची म्हणजेच पर्यायाने अमेरिकेचं अधिपत्य गाजवण्याचं धोरण दुसऱ्या देशांनाही धोकादायक आहे असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.

    दक्षिण कोरियाच्या योनहाप या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान आपात्कालीन सत्रावेळी किम साँग बोलत होते.

    ते म्हणाले,अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांनी रशियाच्या सुरक्षेच्या मागणीची अवहेलना केली. नेटो संघटनेचा पूर्वेत विस्तार व्हावा यासाठी शस्त्रास्त्रं प्रणाली लागू करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युरोपचं सुरक्षित वातावरण कमकुवत करण्याचा डाव आहे.

    याआधी 28 फेब्रुवारीला उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेची अधिपत्य गाजवण्याची वृत्ती रशिया-युक्रेन वादाला कारणीभूत आहे असा दावा केला होता.

    संयुक्त राष्ट्रांच्या सभेत दक्षिण कोरियाचे दूत चो ह्युन यांनी युक्रेनविरुद्धचं युद्ध रशियाने स्वत: लादलेलं आहे अशी भूमिका घेतली.

  18. युक्रेन युद्धातून हे मराठी कुटुंब कसं बाहेर पडलं?

  19. पोलंड, हंगेरीने खुल्या मनाने केलं निर्वासितांचं स्वागत

    युक्रेन, रशिया,
    फोटो कॅप्शन, युक्रेन नागरिक देश सोडताना

    युद्धामुळे जीव वाचवण्यासाठी युक्रेनमधून निघालेल्या नागरिकांचं पोलंड आणि हंगेरी या देशांनी स्वागत केलं आहे.

    युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचे लाखभर नागरिक हंगेरीत दाखल झाले आहेत.

    रस्ते मार्गाने दाखल झालेल्या या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था शाळा, महाविद्यालयं तसंच क्रीडा संकुलांमध्ये करण्यात आली आहे.

    बस, मिनीबस, छोट्या गाड्यांद्वारे त्यांना गंतव्यस्थळी पोहोचवण्यात येत आहे. स्वयंसेवक आणि भाषांतरकार या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत आहेत.

    संयुक्त राष्ट्र संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार युक्रेन सोडणाऱ्या लोकांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. रशियाने युद्ध पुकारल्यानंतर आतापर्यंत युक्रेनच्या 6,60,000 नागरिकांनी देश सोडला आहे.

  20. रशिया-बेलारुसच्या स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बंदी

    युक्रेन, रशिया, बेलारुस
    फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये रशिया, बेलारुसच्या स्पर्धकांना बंदी घालण्यात आली आहे.

    युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशिया आणि बेलारुसच्या स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये प्रवेशाची बंदी घातली. आंतरराष्ट्रीय स्केटिंग युनियनने यासंदर्भात घोषणा केली.

    काही दिवसांपूर्वी फिफा आणि युएफाने रशियावर बंदी घातली होती.

    युक्रेनमध्ये युद्धाचा फटका बसलेल्या प्रत्येक नागरिकाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं आंतरराष्ट्रीय स्केटिंग युनियनने म्हटलं आहे.

    येत्या महिनाभरात जागतिक स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहे.

    स्केटिंग या खेळात रशिया अव्वल देश आहे. बीजिंग 2022 विंटर ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाने स्केटिंग खेळाच पाच पदकांची कमाई केली होती.