ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली
ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली
Published

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.

कापसाला बोंडं कमी लागल्याने आणि कापूस वेचणीचं काम घटल्याने महिलांच्या हाताला काम मिळत नाही. रोजच्या मजुरीवर घर चालवणाऱ्या या महिलांसमोर आता कुटुंबाचा खर्च, मुलांचं शिक्षण आणि कर्ज फेडण्याचं आव्हान आहे.

शेतकऱ्यांसाठी दुष्काळी मदत आणि पीकविम्याच्या योजना आहेत. पण मजुरीवर अवलंबून असलेल्या महिलांच्या उत्पन्नाचं नुकसान भरून काढण्यासाठी काय उपाय आहेत? यवतमाळमधील शेतमजूर महिलांच्या संघर्षाची कहाणी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)