ग्राऊंड रिपोर्ट - दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही, 'फी आणि रोजचा खर्च कसा भागवायचा?'
ग्राऊंड रिपोर्ट - दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही, 'फी आणि रोजचा खर्च कसा भागवायचा?'
Published
महाराष्ट्रातील दुष्काळाचा फटका आता शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही बसतोय.
पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजची फी, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी काम करावं लागतंय.
काहींनी फी भरण्यासाठी कर्ज घेतलंय, तर काही जण कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारने परीक्षा शुल्क माफ केलं असलं, तरी प्रवेश शुल्क आणि इतर खर्चाचा प्रश्न कायम आहे. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक अडचणींचा हा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






